24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeलातूररुफ टॉप सोलार योजनेत लातूर परिमंडळात १४११६८४५८ युनिट विजेची निर्मिती

रुफ टॉप सोलार योजनेत लातूर परिमंडळात १४११६८४५८ युनिट विजेची निर्मिती

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्यात आजपर्यंत कार्यान्वित करण्यात आलेल्या रुफ टॉफ सोलारमधून मोठया प्रमाणात वीज निर्मिती करण्यात आली आहे. महावितरणच्या लातूर परिमंडलात मे २०२२ या महिन्यात २३४५ ग्राहकांच्या छतावरुन १४११६८४५८ युनिट विजेची निर्मिती झाली. त्यात लातूर जिल्ह्यात १६७१ ग्राहकांच्या छतावरुन १३९६७८५९० युनिट, बीड जिल्ह्यात ४४६ ग्राहकांच्या छतावरुन ९१९७७४ युनिट तर उस्मानाबाद जिल्ह्यात २२८ ग्राहकांच्या छतावरुन ५७००९४ युनिट वीज निर्मिती करण्यात आली आहे.

वीज ग्राहकांसाठी फायदयाची ठरणा-या छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी अर्ज स्वीकारण्याचे काम सुरु आहे. जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे.
घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प घेता येतो. यातील केवळ घरगुती ग्राहकांना सबसिडी देण्यात येते. ३ किलो वॅटपर्यंतच्या सोलर पॅनलसाठी ४० टक्के आणि त्यावरील १० किलो वॅटपर्यंतच्या सौरपॅनल प्रकल्पासाठी २० टक्के सबसिडी देय आहे. त्यासाठी अधिकृत एजन्सीमार्फत स्वदेशी बनावटीच्या सौर मोड्युल्सचा वापर करणे अनिवार्य आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या