23.2 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeलातूरनिलंगा नगरपालिकेस बिना तळाची घागर भेट

निलंगा नगरपालिकेस बिना तळाची घागर भेट

एकमत ऑनलाईन

निलंगा : प्रतिनिधी
येथील नगर पालिकेस शेर-ए-हिद शहीद टीपु सुलतान संघटना व नागरिकांच्या वतीने पाणीपुरवठा सतत खंडित व अपुरा होत असल्याचा आरोप करीत को-या निवेदनासह बिन तळाची घागर भेट देण्यात आली. निलंगा शहरास २४ तास पाणी देऊ असे खोटे आश्वासन देऊनही शहरात किमान दोन तासही पाणी देण्यास नगरपालिका असमर्थ ठरली आहे. शहरातील सार्वजनिक बोअर बंद करुन नाळाचे कनेक्शन घेतलेच पाहिजे अशी सक्ती करण्यात आली आहे.

नवीन कनेक्शनचे प्रत्येकी चार हजार पाचशे व जूनि सर्व थकबाकी सक्तीने वसूल करण्यात आली असूनही पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही. दर चार आठ दिवसाला पाईप फुटणे, लीकेज होणे, लाईट नसणे अशी कारणे दाखवून नागरिकांची हेळसांड़ नगरपालिका करीत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सध्या नगरपालिकेची अवस्था या बिन तळाच्या घागरी सारखीच झाली आहे. वरुन दिसायला ठणठणीत पण बिन कामाची असे सांगण्यात येत आहे.

येणा-या काळात सर्व सार्वजनिक बोअर पुन्हा सुरु करण्यात यावेत, नाळाचे पाणी दररोज किमान दोन घंटे सोडण्यात यावे अन्यथा पुढे आंदोलन तीव्र करू असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शेर-ए-ंिहद शहिद टीपू सुलतान संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर, तालुकाध्यक्ष सबदर कादरी, कोंग्रेसचे चक्रधर शेळके, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रमोद कदम, राष्टवादीचे ईफरोज शेख, रिपब्लकन सेना तालुका अध्यक्ष सुनील सूर्यवंशी, अकबर खड़के, वसीम सय्यद, अकबर रईस, माजीद खड़के, धीरज गायकवाड़, फरीद शेख यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या