36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeलातूरश्री रेणुकादेवीच्या मंदिरात घटस्थापना

श्री रेणुकादेवीच्या मंदिरात घटस्थापना

एकमत ऑनलाईन

रेणापुर : रेणापूरची ग्रामदैवत लाखो भाविकांचे श्रध्दास्थान श्री रेणुकादेवीची घटस्थापना मंदिर ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार राहुल पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सरस्वती पाटील यांच्या हस्ते शनिवारी (१७ ऑक्टोबर) ‘आई राजा उदो-उदो’ च्या जयघोषात अगदी साध्या पध्दतीने घटस्थापना करून विधीवत महापुजा करण्यात आली. पुजारी राजु धर्माधिकारी व सुहास मुसांडे यानी देवीची विधीवत महापुजा आरती केली.

या घटस्थापनेला श्री रेणुकादेवी मंदीर विश्वस्त मंडळाचे कार्यकारीध्यक्ष राम पाटील, पोलीस निरीक्षक गोरख दिवे, ट्रस्टचे संचालक तुकाराम कोल्हे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमाकांत वाघमारे, दिलीप आकनगीरे, पंडीत माने, दत्ता जाधव (गोंधळी), सुरेश घडसे, अ‍ॅड. प्रशांत आकनगीरे, संजय घडसे, रेणापूरचे मंडळ अधिकारी दिलीप देवकते, तलाठी गोंिवद शिंगडे, पुंडलीक इगे, काशीनाथ हलकुडे यांची उपस्थिती होती.

कोरोना महामारीमुळे राज्य सरकारने सर्व मंदिरे बंद ठेवली आहेत. त्यामुळे या वर्षी रेणापूर व पंचक्रोसीत प्रसिध्द असलेले भावीकांचे श्रध्दास्थान, ग्रामदैवत श्रीरेणुका देवीचा नवरात्र महोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा केला जाणार असून शनिवार (१७ ऑक्टोबर) दुपारी एकच्या सुमारास श्रीरेणुकादेवी ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष तथा रेनापुरचे तहसीलदार राहुल पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सरस्वती पाटील यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. यावेळी श्री रेणुकादेवीचे पुजारी राजु धर्माधिकारी यांनी विधीवत मंत्र व आरती करून घटस्थापनेचा विधी पूर्ण केला. मंदिर बंद असल्याने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये नवरात्र महोत्सवातील घटस्थापना करण्यात आली. दरवर्षी वाजत-गाजत भाविक भक्तांच्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत घटस्थापना केली जात होती. मात्र या वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे अगदी साध्या पद्धतीने घटस्थापना करण्यात आली.

चार व्यक्तींनाच विधीवत पूजाअर्चा करण्यासाठी परवानगी
नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत रेणापूर तहसीलदार राहुल पाटील व पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांच्या सुचनेनुसार मंदिरामध्ये फक्त नीतिनियम विधिवत करणा-या चार व्यक्तींनाच विधीवत पूजाअर्चा करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मंदिरामध्ये दर्शनासाठी कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. प्रत्येक गेटवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच रेणापूर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी विश्वस्त मंडळ व इतर कोणत्याही भावीकाला दर्शनास मंदीरात येण्यास मनाई करावी, अशी सक्त ताकीद तहसीलदार राहुल पाटील, पोलीस निरिक्षक गोरख दिवे यांनी ट्रस्ट मंडळाला दिली.

कोरोनाने कलेला केले लॉकडाऊन…. शासनाचे ही दुर्लक्ष

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या