24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeलातूरजमिनीच्या ताब्यासाठी तलवारीसह घुडगूस

जमिनीच्या ताब्यासाठी तलवारीसह घुडगूस

एकमत ऑनलाईन

औसा : शहरातील सर्वे नंबर -१७३ (ब) मधील जमिनीचा ताबा घेण्यासाठी दहशत माजवत सिनेस्टाइलने हातात तलवार, कत्त्या, चाकू, लाठ्या, काट्या, हॉकीस्टिक घेऊन दहशत पसरविविण्याच्या उद्देशाने दंगा करण्यात आला. यात दोन जेसीबीच्या साहायाने पत्र्यच्या शेडसह या जागेवरील बांधकामे जमीनदोस्त करण्यात आले. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने औसा पोलिस ठाण्यात २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून एक जेसीबी जप्त करण्यात आली.

या घटनेमुळे औसा शहरात एकच खळबळ उडाली माजली असून हातात घातक शस्त्रे घेत दहशत पसरवल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दि. २५ जून २०२२ शनिवार रोजी सकाळी ११ : ३० वाजण्याच्या सुमारास आक्रमखान पठाण यांच्या घराच्या शेत जमिनीजवळ असलेल्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी लातूर येथील कलीम मेहबूब पठाण, हणमंत फेरे, हबीब पठाण, ओम आडे, महेबूब पठाण, मुनाफ हमीद शेख, दस्तू नबी सय्यद यांच्यासह अन्य भाडोत्री गुंडासह १० ते १५ अनोळखी व्यक्तींनी गैरकायदेशीर मंडळी जमून दोन जेसीबीसह हातात घातक हत्यार तलवारी, कत्त्या, लाठ्या,काठ्याासह हॉकी स्टिक घेऊन जमिनीचा ताबा घेण्यासाठी प्रवेश केले.

त्या जागेवरील तेथील पत्र्याचे शेड व बांधकामे जमीनदोस्त करीत दहशत पसरविण्याच्या उद्देशाने दंगा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून शहरात सामाजिक शांततेचा भंग झाल्यामुळे या व्हिडीओची खातरजमा करुन बिट अंमलदार महारुद्र डिग्गे यांच्या फिर्यादीवरून दि. २७ जून २०२२ सोमवारी रोजी रात्री उशिरा २३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील इतरांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी एक जेसीबी जप्त केल्याचे तपासिक अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव सानप यांनी सांगितले.

जिल्हा पोलिस अधीक्षकांची धटनास्थळी भेट
पोलीस अधीक्षक निखिल ंिपगळे यांनी दि. २७ जून २०२२ सोमवारी रोजी घटनास्थळी भेट दिल्यानंतर दिवसभर ठाण्यातून परिस्थितीची माहिती घेतली. सदरचा प्रकार हा दहशत पसरविण्याच्या उद्देशाने केला होता. या घटनेची पार्श्वभूमी पाहता, पोलिस निरीक्षक शंकर पटवारी यांना तात्काळ औशातून लातूरच्या नियंत्रण कक्षात संलग्न केले. औसा पोलीस ठाण्याचा तात्पुरता कार्यभार पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब डोंगरे यांच्याकडे देण्यात आला असून रात्री उशिरा पोलिस निरीक्षक पटवारी यांनी औसा पोलिस ठाण्याचा पद्भार सोडल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर पवार यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या