34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeलातूरशिरूर अनंतपाळ तालुक्यात अद्रक शेतीचा प्रयोग

शिरूर अनंतपाळ तालुक्यात अद्रक शेतीचा प्रयोग

एकमत ऑनलाईन

शिरुर अनंतपाळ (शकील देशमुख) : तालुक्यात काही शेतक-यांनी पहिल्याच अद्रक शेतीचा प्रयोग यशस्वी प्रयोग केला आहे. मात्र सध्या भावात मंदी असल्याने यावर्षी अद्रकउत्पादक शेतक-याना अद्रक शेतीचा प्रयोग अंगलट आला असून अद्रक शेती बहरली असली तरी यातून उत्पादन खर्च निघणे कठीण झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत

तालुक्यात अद्रक उत्पादन घेणा-याची संख्या फार कमी आहे. सामान्य शेतक-यांना न झेपावणारा उत्पादन खर्च, पाण्याची कमरता व अद्रकासाठी उपयुक्त जमीन अशी अनेक कारणे असतानाही काही शेतकरी त्यांच्या शेतात नवनवीन प्रयोग करून उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न करतात. यंदा शिरूर अनंतपाळ व तुरुकवाडीसह काही गावांत शेतक-यांनी अधिकच्या उत्पन्नासाठी अद्रक शेती केली. मात्र भाव नसल्याने अद्रक शेतीचा प्रयोग फसला असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षापासून तालुक्यातील अनेक शेतकरी अत्याधुनिक शेतीकडे वळले असून पारंपारिक शेतीला फाटा देत बाजारात मिळत असलेला चांगला भाव व नगदीचे उत्पन्न या आशेने शेतीत नव नवे प्रयोग करताना दिसत आहेत. भाजीपाला, फुलशेती,फळबाग,टरबूज, केळी,हळद व इतर नगदीच्या पिकांची लागवड करून आर्थिक नफा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत

अद्रकउत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटामुळे, एक तर पिकत नाही त्यात पिकलंच तर विकत नाही अशी परिस्थिती शेतक-यांची झाली आहे. पारंपारिक शेतीला फाटा देत अधिकच्या उत्पन्नासाठी मोठा लागवड खर्च करून अद्रक पिकविले. त्यातून मोठे उत्पन्न अपेक्षित असताना सध्या बाजारात अद्रकला अत्यल्प भाव असल्याने त्यातून उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले
-राजेश्वर सुगावे, शिरूर अनंतपाळ, -मनोहर कोतवाडे, तुरूकवाडी

गोरगरीब विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचा घेतला वसा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या