लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. २२ जुलै रोजी सकाळी लातूर शहरातील गांधी मार्केट परिसरातील लातूर महानगरपालिकेच्या वतीने बेघर नागरिकांसाठी बांधण्यात येणा-या निवारा जागेची पाहणी केली. या ठिकाणी बेघरांना माफक दरात चांगल्या उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात तसेच लगतच्या मार्केटमध्ये नियमित स्वच्छता राखावी, अशा संबंधितांना केल्या.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी महापौर अॅड. दीपक सूळ, माजी नगरसेवक रविशंकर जाधव, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अॅड. समद पटेल, माजी नगरसेवक अशोक गोविंदपुरकर, कैलास कांबळे, युनुस शेख, विजयकुमार साबदे, आयुब मणियार, सचिन बंडाप्पले, इम्रान सय्यद, विकास वाघमारे, हरी भगत, रत्नदीप अजणीकर, दत्ता सोमवंशी, व्यंकटेश पुरी, आरपीआय कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष एन.डी. सोनकांबळे, लातूर जिल्हा काँग्रेसचे सोशल मीडियाचे अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, महानगरपालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नवनाथ केंद्रे, ‘डी’ झोनचे मनपा क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते. तसेच लातूर नेता या वृत्त वाहिनीला एक वर्ष पूर्ण झाले आहे म्हणून लातूर नेताचे प्रमुख नेताजी जाधव यांना आमदार देशमुख यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.