21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeलातूरसुदृढ आरोग्य महत्त्वाचे

सुदृढ आरोग्य महत्त्वाचे

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये एकता आणि अनुशासनासोबत आपले आरोग्य निरोगी, सुदृढ आणि आनंदी असणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद एनसीसी ग्रुपचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर एम. एम. विटेकर यांनी बोलताना व्यक्त केले. ५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, लातूरच्यावतीने लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील एनसीसी कॅडेटचे वार्षिक प्रशिक्षण शिबिर (एटीसी २०८) जवाहर नवोदय विद्यालय, लातूर येथे दि. २८ जून ते ०७ जुलै २०२२ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये गेस्ट लेक्चमध्ये प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते यावेळी कॅम्प कमांडर लेफ्टनंट कर्नल संतोषकुमार, डेपोटी कमांडर सुभेदार मेजर दीपक कुमार आणि कॅप्टन डॉ. बाळासाहेब गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना कमांडर ब्रिगेडियर एम. एम. विटेकर म्हणाले की, राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक प्रशिक्षणामधून व्यक्तिमत्व विकासासोबत आरोग्यविषयक माहिती सुद्धा दिली जाते. वार्षिक प्रशिक्षणात आपल्याला विविध विषयांमध्ये प्रात्यक्षिकरुपात प्रशिक्षित करण्यात आले आहे याचा फायदा आपण देशसेवेसाठी करावा असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, लातूरतर्फे कमांडर ब्रिगेडियर एम. एम. विटेकर यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले. या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी लेफ्टनंट चीतमपल्ले डी.एस.,चीफ ऑफिसर मांडवकर अनिल, चीफ ऑफिसर महावीर काळे, थर्ड ऑफिसर चांदणे बाबुराव, लेफ्टनंट अर्चना टाक, लेफ्टनंट सरस्वती वायभासे, लेफ्ट.म्हावरकर आर.जी., लेफ्टनंट हरीभाऊ पावडे, आप्पासाहेब वाघमोडे, सुभेदार सत्यवान जाधव, सुभेदार दिलीप दामोदर, सुभेदार भोपाल सिंग, सुभेदार कच्छवे, नायब सुभेदार शेंडगे दिलीप, हवालदार चित्रपाल सिंग, हवालदार अमनदीप कार्यालयाचे हेड क्लर्क घोगरे बी.व्ही., जयपाल काटकर आदींचे सहकार्य मिळत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या