22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरमेकअप आर्टिस्ट प्रशिक्षण कार्यशाळेला चांगला प्रतिसाद

मेकअप आर्टिस्ट प्रशिक्षण कार्यशाळेला चांगला प्रतिसाद

एकमत ऑनलाईन

लातूर : येथील श्रीमती सुशिलादेवी देशमुख महाविद्यालया अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष ‘महिला समक्षीकरण व महिला सबलीकरण कक्ष’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच ते सात मे तीन दिवस प्रशिक्षण कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत २६ युवतींचा सहभाग होता.

सौंदर्यप्रसाधने समज आणि गैरसमज या विशेष मार्गदर्शन मेकअप आर्टिस्ट वैष्णवी सलगर या म्हणाल्या की, सद्यस्थितीत आपण वापरत असलेली सौंदर्यप्रसाधने आरोग्यदायी आहेत की हानीकारक कारण आपल्या त्वचेचा चकचकीतपणा साठी सुंदर मुलायम प्रसन्न चेहरा साठी आपण नैसर्गिक आयुर्वेदिक घरगुती फळे, रस, काकडी, बटाटा, टोमॅटो व लिंबू यांचा उपयोग करुन नैसर्गिक सौंदर्य व स्वच्छता दही ताक चेह-याची सुंदर निगा कशी राखु शकतो. याविषयी प्रत्यक्ष माहिती दिली. या बरोबरच आपल्या त्वचेवर परिणाम करतील अशी बाजारी प्रॉडक्ट्स वापरु नये. काळजी व सावधानता बाळगावी असे ही सांगितले.

याबरोबरच आपले डोळे जे हे विश्व आपणास दाखवतात. ज्या डोळ्याच्या आधारावर आपण जगतो. त्या डोळ्याचे सौंदर्य किती अनमोल आहे. यासंदर्भात ब्युटी केअर प्रोफेशनल पार्लरच्या संचालिका सौ. रेणुका वाडेकर यांनी आपल्या डोळ्याचा लूक बदलण्यासाठी आपले डोळे उठून दिसावेत म्हणून जे मेकअप करतो त्या संदर्भात कोणती काळजी घ्यावी, डोळे स्वच्छ ठेवणे ते नाजूक आहेत.डोळ्यांची निगा राखून डोळ्याचे सौंदर्य कसे सांभाळावे. याविषयी सविस्तर माहिती दिली. या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन हिंदी विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका डॉ. सविता कीर्ते यांनी केले.

या कार्यशाळेसाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय पाटील हे होते. यावेळी विचार मंचावर डॉ. कुमार बनसोडे, प्रा. डॉ. सविता किर्ते, सौ. रेणुका वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रशिक्षण वर्गाचे प्रास्ताविक व सविस्तर माहिती डॉ. सविता कीर्ते यांनी दिली. अध्यक्षीय डॉ. अजय पाटील यांनी केला. यावेळी डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमाविषयी विवेचक माहिती दिली व मनोगत व्यक्त केले. सर्व प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या प्रशिक्षण वर्गाचे सुरेख सूत्रसंचलन कु.शेख शबनम यांनी केले तर आभार प्रा. डॉ. कुमार बनसोडे यांनी मानले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या