24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरछत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याशी गोसावी समाज जोडला

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याशी गोसावी समाज जोडला

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
गोसावी समाज हा धार्मिक आहे. प्रामाणिक आहे. वेळ प्रसंगी हातात तलवार घेऊन उतरलेला आहे. बहुतांश मठाधिपती हे गोसावी आहेत. निश्चल पुरी कृत दुसरा शिवराज्याभिषेक सोहळा हा गोसावी समाजाचा ब्रँड आहे. गोसावी समाज हा डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याशी जोडला गेला आहे. हा एवढा मोठा बहुमान कोणत्याही समाजाला मिळाला नाही. कोणत्याही अडचणीच्या प्रसंगाला मी तुमच्या सोबत असेन. गोसावी समाज हा अतिशय प्रगल्भ आहे. या समाजाला धार्मिक वसा आणि वारसा आहे. तोच वसा आणि वारसा गोसावी समाज युवा प्रतिष्ठान लातूरचे डॉ. धर्मवीर भारती, अनिल पुरी यांच्या माध्यमातून चालवला जात आहे. याचा मनस्वी आनंद आहे, असे प्रतिपादन श्रीमंत युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी गोसावी समाजाच्या महाधिवेशनात केले.

गोसावी समाज युवा प्रतिष्ठान लातूरच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त आयोजीत महा अधिवेशनाचे उद्घाटन श्रीमंत युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते झाले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोसावी समाजाचे राष्ट्रीय नेते योगेश बन होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवा कीर्तनकार अविनाश भारती यांच्यासह युवा उद्योजक सुखदेव गिरी, शिवसंभा गोसावी, आंतरराष्ट्रीय योग सद्गुरू डॉ. कृष्णदेव गिरी, युवा सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती. या अधिवेशनात उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी, डॉ. अशोक बन, धनराज गिरी, अ‍ॅड. राजश्री गोसावी आदी मान्यवरांना राज्य समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. तर उपक्रमशील व आदर्श कार्य संघटना म्हणून दशमान युवक प्रतिष्ठान परभणी यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला. तसेच डॉ. धर्मवीर भारती, सौ मिरा धर्मवीर भारती. डॉ. विश्रांत भारती, प्रा.रमेश भारती यांनाही आपल्या उल्लेखनीय कामाबदल या वेळी सन्मानीत करण्यात आले.

आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण केलेल्या प्रा.संतोष गिरी, अमित पुरी, गोविंद गिरी, केतन पुरी, सौ.अनिता भारती, सुनील भारती, प्रमोद गोसावी आदी मान्यवरांना गौरव कर्तृत्वाचा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सौ.सुनिता पुरी, सौ.पूनम गिरी, दिलीप गिरी, दत्ता पुरी, शंकर गिरी, बंडू पुरी आदी समाज बांधवांना विशेष पुरस्काराने या वेळी गौरविण्यात आले. अधिवेशनात इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. धर्मवीर भारती यांनी तर संचलन अनिल पुरी यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या