30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeलातूरलातूरमधील कोविड-१९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा अधिक सक्रीय

लातूरमधील कोविड-१९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा अधिक सक्रीय

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्यात विशेष करून लातूर शहरात कोविड-१९ ची रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे, ही गंभीर बाब लक्षात घेता सर्वच शासकीय यंत्रणा अधिक सक्रीय होण्याचे निर्देश दिले आहेत. या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनाही मास्कचा वापर, हाताची स्व्च्छता, परस्परातील अंतर या संदर्भातील सूचनांचे तंतोतंत पालन करून स्वयंशिस्त बाळगावी, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.

मागच्या काही दिवसांत लातूर जिल्हा आणि लातूर शहरात कोविड-१९ ची रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, महानगरपालिका आणि विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्था यांच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे असले तरी या सर्वच यंत्रणांना या पुढील काळात अधिक दक्षतेने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे सांगून पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे की, कोविड-१९ प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी जनतेनेही महत्त्वाची भूमिका बजावणे गरजेचे आहे.

शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे नागरिकांकडून तंतोतंत पालन होणे आवश्यक आहे. कोणत्याही ठिकाणी गर्दी करू नये, नागरिकांनी अत्यावश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, बाहेर पडताना प्रत्येकाने मास्कचा वापर अनिवार्यपणे करावा, वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत, सॅनिटायझर वापर नियमित करावा, सामाजिक अंतर पाळावे, प्रत्येकानेच स्वयंशिस्त पाळावी. असे आवाहनही पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

Read More  एकमतच्या दणक्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या