19 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeलातूरशासकीय दूध शीतकरण केंद्र बंद !

शासकीय दूध शीतकरण केंद्र बंद !

एकमत ऑनलाईन

लातूर : उदगीर येथील शासकीय दुध शितकरण केंद्र गेल्या पाच महिण्या पासून बंद असल्याने शेतक-यांना ना विलाजास्तव खाजगी दुध संकलन केंद्रावर दूध द्यावे लागत आहे. यामुळे शेतक-यांची गैर सोय होत आहे. शासकीय दुध संकलन सुरू करण्याची मागणीही शेतक-यामधून होत आहे. तसेच शासकीय स्तरावर दुध शितकरण केंद्र सुरू करण्याच्या संदर्भाने हालचाली सुरू झाल्या आहेत.

उदगीर येथील शासकीय दुध भुकटी प्रकल्प १९७९ रोजी सुरू झाला होता. या प्रकल्पातून प्रतिदिन ११ मेट्रीक टन दुध बुक्टी तयार होत होती. तसेच या ठिकाणी दुध शितकरण मशनरीही कार्यरत होती. शासकीय दुध भुकटी प्रकल्पाची दोनदा दुरूस्ती करूनही सदर प्रकल्प बंद पडला आहे. तसेच या ठिकाणी असलेले दुध शितकरण मशनरीही २६ जून २०२०० पासून बंद पडल्याने शासकीय दुध संकलन थांबले आहे. या शासकीय दुध शितकरण केंद्राला औसा, शिरूर ताजबंद, अहमदपूर, निलंगा या शासकीय दुध संकलन केंद्रावरून दुधाचा पुरवठा होत होता. मात्र शासकीय दुध शितकरण केंद्र गेल्या पाच महिण्यापासून बंद पडल्याने या परिसरातील शेतक-यांची गैरसोय झाली आहे.

लातूर जिल्हयात सप्टेंबर अखेर सहकारी दुध संकलन केंद्रावर १० हजार ५२५ लिटर व खाजगी दुध संकलन केंद्रावर ५४ हजार लिटर असे प्रतिदिन ६४ हजार ८८२ लिटर दुधाचे संकलन होत आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर मध्ये सहकारी दुध संकलन केंद्रावर ९ हजार ८८६ लिटर, खाजगी दुध संकलन केंद्रावर ४६ हजार ८२९ लिटर, तर शासकीय दुध संकलन केंद्रावर ८ हजार ७५८ लिटर असे प्रतिदिन ६५ हजार ४७५ लिटर दूध संकलन होत होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी सप्टेंबर मध्ये ५९३ लिटर दुधाची घट झाल्याचे दिसून येत आहे.

हैद्राबादला दुधाची मोठी मागणी
लातूर जिल्हयात पाच खाजगी दुध संकलन डेअरी आहेत. यात हेरिटेज दुध डेअरी, उदगीर, सागर दुध डेअरी लोहारा, उदगीर, जर्सी दुध डेअरी निलंगा, नळेगाव, चिंचोली, औसा, मस्तकी दुध डेअरी अहमदपूर, या खाजगी दुध डिअरींचे प्रतिदिन ५० हजार लिटर दुध हैद्राबाद येथे विक्रीसाठी जाते. तर उजना दुध डेअरीचे ५ हजार लिटर दूध औरंगाबाद, मुंबई या ठिकाणी सोयीनुसार पाठवले जाते.

शासकीय दुध भुकटी प्रकल्पासाठी १० कोटीची गरज
जिल्हयातील उदगीर येथील शासकीय दुध भुकटी प्रकल्प गेल्या कांही वर्षापासून बंद आहे. या प्रकल्पातून प्रतिदिन ११ मेट्रीक टन दुध बुक्टी तयार होत होती. सदर दुध भुकटी प्रकल्प कार्यान्वीत करण्यासाठी शासनाकडे १० कोटी ७२ लाख ४९ हजार रूपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. शासन या प्रकल्पाच्या संदर्भाने काय निर्णय घेणार यावर बरेच कांही आवलंबून आहे.

अंबाजोगाई व परभणीला दूध पाठवणार
जिल्हयातील उदगीर येथील शासकीय दुध शितकरण केंद्रातील तांत्रीक आडचणीमुळे शासकीय दुध संकलन केंद्र २६ जून पासून बंद आहे. दुध शितकरण केंद्र चालू करण्यासाठी १५ लाख रूपयांचा प्रस्ताव उदगीरचे डेअरी मॅनेजर यांनी प्रादेशीक दुग्ध विकास व्यवसाय अधिकारी यांच्याकडे पाठवला आहे. सदर यंत्रणा सुरू होईपर्यंत अंबाजोगाई व परभणी येथे शासकीय दुध संकलन करून पाठण्याच्या संदर्भाने वरिष्ठांशी चर्चा होऊन जवळपास सहमती झाली आहे. येत्या दोन-चार दिवसात या संदर्भाने निर्णय होऊन लातूर जिल्हयातील शासकीय दुध संकलन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सदर दुध हे अंबाजोगाई व परभणी येथे पाठवले जाणार असल्याची माहिती जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी बी. डी. दुधाटे यांनी दिली.

आमदारांनी केली नुकसानीची ट्रॅक्टरव्दारे पाहणी

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या