21.9 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeलातूर'महाराष्ट्र उदयगिरी'त पदवी प्रमाणपत्र वितरण

‘महाराष्ट्र उदयगिरी’त पदवी प्रमाणपत्र वितरण

एकमत ऑनलाईन

उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात मार्च २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., एम.ए., एम.एस्सी. बी.सी.ए., एम.सी.एम. अशा पदवी व पदव्युत्तर परीक्षेतील यशस्वी स्रातकांना पदवी प्रमाणपत्र वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी होते तर प्रमुख पाहुणे डॉ.डी.एम.नेटके, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड हे होते, मंचावर उपाध्यक्ष डॉ. रेखा रेड्डी व अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव डॉ.रामप्रसाद लखोटिया, सदस्य बसवराज पाटील मलकापूरकर व प्रशांत पेन्सलवार, प्रभारी प्राचार्य डॉ. बी. एम.संदीकर, उपप्राचार्य डॉ. आर.के.मस्के, परीक्षा प्रमुख प्रा.डॉ.जयप्रकाश पटवारी, प्रा. डॉ.एस.जी.पाटील, प्रा.डॉ.आर.पी.साबदे, प्रा.डॉ.बी.एस.होकरणे यांची उपस्थिती होती. विद्यापीठ गीत प्रा.डॉ.मुकेश कुलकर्णी व प्रा.अश्विन वळवी यांनी सादर केले. प्रास्ताविक परीक्षा विभाग प्रमुख प्रा.डॉ.जयप्रकाश पटवारी यांनी केले. यावेळी डॉ.नेटके यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.अर्चना मोरे यांनी केले तर आभार प्रा.डॉ.शफिका अन्सारी यांनी
मानले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या