24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरआधार सिडिंग न झालेल्या लाभार्थ्यांचे धान्य बंद होणार

आधार सिडिंग न झालेल्या लाभार्थ्यांचे धान्य बंद होणार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
पुढील महिन्यापासून आधार सिडिंग न झालेल्या लाभार्थ्यांचे धान्य बंद होणार असल्यामुळे तात्काळ ई- केवायसी करुन घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. व जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुने तसेच तालुका स्तरावरुन तहसीलदार स्वप्नील पवार यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

लातूर तालुक्यातील सर्व शिधापत्रिका धारकांना कळविण्यात येते की, आपल्या कुटुंबातील रेशनकार्डमधील ज्या सदस्याच्या नावापुढे आधार क्रमांक समाविष्ट नाही, अशा नावासमोर आधार क्रमांक समाविष्ट करण्यासाठी आपल्या कुटुंबातील ज्या सदस्यांचे आधार सिडींग झालेले नाही, अशा सदस्यांनी आपले आधार कार्ड घेवून आपआपल्या रास्त भाव दुकानात जाऊन ई-पॉस मशीनवरती तात्काळ इकेवायसी करुन घ्यावी.

याबाबत अन्न, नागरी पुरवठा विभाग व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांनी पात्र लाभार्थी यांच्या ऑनलाईन रेशन कार्डमधील ज्या सदस्याच्या नावापुढे आधार क्रमांक समाविष्ट नाही, अशा नावासमोर आधार क्रमांक समाविष्ट करणे आत्यावश्यक असल्याने सर्व पात्र लाभार्थ्यांना शंभर टक्के आधार सिडिंग करण्यासाठी आपापल्या रास्­त भाव दुकानामध्ये जाऊन आपले इकेवायसी करुन घेण्याबाबत कळविले आहे.

आधार सिडिंगसाठी विशेष मोहीम
आधार सिडिंगसाठी जिल्ह्यात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत प्रत्येक रास्तभाव दुकाननिहाय एक नोडल अधिकारी, कर्मचा-याची नेमणूक करणे, प्रत्येक गावांमध्ये आधार नोंदणी करण्याबाबत मोहीमेचा दिनांक जाहीर करणे, प्रत्येक तहसीलदारांनी सर्व नोडल अधिकारी, कर्मचारी यांना आधार सिडिंग न झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या पुरवणे, रास्तभाव दुकानदारांनी सर्व लाभार्थ्यांचे आधार क्रमांक जमा करुन ई-पॉस मशिनवर ई-केवायसीद्वारे आधार सिंिडंग करावे, सर्व तहसीलदारांनी त्यांच्या अधिनस्त तालुक्यांतील आधार सिडिंग झालेल्या लाभार्थ्यांची व न झालेल्या लाभार्थ्यांची माहिती कारणांसह एकत्रीत करुन जिल्हा पुरवठा कार्यालयास दि. २२ सप्टेंबरपर्यंत सादर करावी लागणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या