24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeलातूरनियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांना ५० हजारांचे अनुदान

नियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांना ५० हजारांचे अनुदान

एकमत ऑनलाईन

शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
नियमितपणे कर्जफेड करणा-या शेतक-याना प्रोत्साहन अनुदान लाभ देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती.१ जुलै कृषीदिनापासून प्रोत्साहन योजनेतील पात्र शेतक-यांना वाटप होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली असून बहुप्रतीक्षेनंतर प्रोत्साहन अनुदान मिळणार असल्याने शेतक-यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केल्यानंतर शेतक-याच्या आशा उंचावल्या. त्यात सोसायट्याकडून आधारकार्ड व बँक पासबुक झेरॉक्स व मोबाईल नंबर घेतल्याने लवकरच प्रोत्साहन अनुदान मिळेल,अशी आशा वाटत होती.अखेर १ जुलैपासून प्रत्यक्ष मदत मिळणार असल्याने शेतकरी आनंदीत झाला आहे. दरम्यान शेतक-याना सोसायट्यामार्फत पीक कर्ज वाटप केले जाते.यात गेल्या २०१७-१८ पासून बहुतांश शेतकरी नियमित कर्जफेड करतात.

अशा शेतक-याना शासनाकडून ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देणार असल्याचे जाहीर केले मात्र ही रक्कम केंव्हा मिळणार यांकडे शेतक-याचे लक्ष लागले होते.अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर राज्य शासनाकडून नियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांंना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदान देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ११ मार्च रोजी जाहीर केले होते. त्यानुसार गेल्या काही दिवसात सोसायटीद्वारे नियमित कर्जफेड करणा-या शेतक-याची माहिती संकलित करण्यात येऊन प्रत्यक्ष मदतीची घोषणा केल्याने अडचणीच्या काळात शेतक-यांना याचा लाभ होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या