23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeलातूरलातूरमध्येही मोठी गुणवत्ता; अधिक दर्जेदार खेळाडू घडवूया

लातूरमध्येही मोठी गुणवत्ता; अधिक दर्जेदार खेळाडू घडवूया

एकमत ऑनलाईन

लातूर : देशाला स्वातंत्र्य मिळून आपल्याला ७५ वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा कार्यालयातंर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यातंर्गत मॅरेथॉन स्पर्धेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात १३, १४, १५ ऑगस्ट हे तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यातील सर्वात मोठा कार्यक्रम हर घर झेंडा उपक्रम आहे. आपआपल्या घराच्या छतावर दर्शनी भागात लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी तिरंगा फडकविण्यात यावेत, असे आवाहन करुन खेळात लातूरमध्येही मोठी गुणवत्ता आहे, अधिक दर्जेदार खेळाडू घडवू या, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी केले.

या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन लातूर आसौ रोडवरील जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, क्रीडाधकारी मदनलाल गायकवाड, कृष्णा केंद्रे, ब्रम्हकुमारीजचे पदाधिकारी, आदिंची यावेळी उपस्थिती होती. या मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात जिल्हा क्रीडा संकुल, लातूर येथून सकाळी ६.३० वाजता सुरु झाली. यात १४ वर्षाखालील मुले, मुली यांचा गट ३ कि.मी., १७ वर्षाखालील मुले, मुली ५ कि.मी व त्यापुढील वयाचा खुला गट १० कि.मी. ठेवण्यात आलेला होता. या मॅरेथॉनमध्ये प्रथम तीन क्रमांकाच्या विजयी स्पर्धकांना रोख रक्कम, मेडल व प्रशस्तीपत्रक बहाल करण्यात आले. स्पर्धेचा मार्ग उपस्थित ठिकाणी सांगण्यात आला. यावेळी जिम्नॅस्टीक, एरोबिक्स यांचे प्रात्याक्षिक जिल्हा क्रीडा संकुल येथे दाखविण्यात आले.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. बोलतांना म्हणाले की, जेंव्हा भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली, तेंव्हा भारत आणि पाकिस्तान हे दोन देश स्वतंत्र झाले होते, हे आपल्या सर्वांना माहितच आहे. त्यावेळी भारतातून पाकिस्तानात, तर पाकिस्तानातून भारतात अशा प्रकारे नागरिकांनी स्थलांतर झाले. यामध्ये अनेक भारतीयांना यात प्राणही गमवावे लागले आहेत. त्या स्मृतीप्रित्यर्थ आपण उद्या तो संवेदना दिवस पाळणार आहोत. भारतामध्ये एथलॅक्टिस या खेळामध्ये प्रगती होत असतांना दिसून येत आहे, बीड जिल्ह्यातील अविनाश साबळे हे केवळ ०.५ सकेंदाने पहिल्या क्रमांकावरुन गेले असून त्यांचा दुसरा क्रमांक आला आहे. अशा मॅरेथॉनमधून उद्याचे साबळे यांच्यासारखे देशाचे नाव उचावणारे खेळाडू घडावेत. त्यासाठी अशा मॅरेथॉन घेणे महत्वाच्या आहेत, अशी भावना जिल्हाधिकारी यांनी यावेळी व्यक्त केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या