लातूरकरांसाठी मोठा दिलासा : साई, नागझरीत आले पाणी

575
जिल्ह्यात सरासरी ६.२६ मि. मी. पावसाची नोंद

लातूर : गेल्या आठवडाभरापासून लातूर शहर, जिल्ह्यात पावसाने मुक्काम ठोकलेला आहे़ पावसाच्या दररोजच्या दमदार हजेरीमुळे लातूरपासून जवळच असलेल्या साई आणि नागझरी बॅरेजेसमध्ये बºयापैकी पाणी आले आहे़ दि़ २७ सप्टेंबर २०१८ रोजी लातूर शहराला पाणीपुरवठा होणाºया मांजरा धरणातील उपयुक्त पाणी साठा संपला होता़ तेव्हापासून आजतागायत लातूर शहराला मांजरा धरणातील मृत साठ्यातूनच पाणीपुरवठा होत आहे़ साई आणि नागझरी बॅरेजेसला पाणी येण ही लातूरकरांसाठी मोठा दिलासा देणारी घटना आहे.

तीन वर्षानंतर यंदा प्रथमच मृग चांगल्या प्रकारे बरसतो आहे दि. ८ जूनला लातूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली ती अद्याप कायम आहे़ जिल्ह्यात दररोज कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी आहे त्यामुळे एकीकडे शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीला लागला तर दुसरीकडे साई आणि नागझरीला पाणी आल्याने लातूरकरांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्यात जमा आहे़ साई आणि नागझरीच्या बॅरेजेसमधील पाणी पातळीत या पावसाने वाढ झाली आहे़ त्यामुळे आगामी काळातील काही महिन्यांचा पाणी प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे़ नागझरी जलाशयात दीड मीटर म्हणजेच ०़६२५ एमएमक्युब पाणी उपलब्ध झाले आहे़ साईच्या जलाशयातही मोठी वाढ झाल्याने तेथूनही लातूरकरांसाठी पाणी उपसा करणे सहज शक्य होणार आहे.

Read More  ‘अल्प प्रमाणातील डोस : डेक्‍सामेथासोन’ रामबाण उपाय ठरल्याचा दावा

लातूर शहराला पाणीपुरवठा करणाºया केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणातील उपयुक्त पाणी साठा दि़ २७ सप्टेंबर २०१८ रोजी संपला होता़ तेव्हापासून म्हणजेच गेल्या १८ महिन्यांपासून लातूर शहराला मांजरा धरणातील मृत जल साठ्यातूनच दर १० दिवसाला पाणीपुरवठा केला जात आहे़ मांजरा धरणातील मृत पाणी साठा जास्तीत जास्त दिवस लातूर शहराला पुरविता यावा, यासाठी महानगरपालिकेने महिन्यातून ३ वेळा पाणीपुरठा करण्याचे नियोजन केलेले आहे़ आजघडीला मांजरा धरणात १६़७०० एमएमक्युब इतका पाणी साठा उपलब्ध आहे शिवाय साई आणि नागझरी जलाशयातही बºयापैकी जल साठा उपलब्ध असल्याने लातूर शहराची पाण्याची काही महिन्यांची चिंता मिटली आहे़

जिल्ह्यात सरासरी ६.२६ मि. मी. पावसाची नोंद

जिल्ह्यात दि़ १६ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी ६.२६ मि. मी. पावसाची नोंद झाली असून आजपर्यंत झालेला पाऊस हा जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या १४.४४ टक्के झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यात दि़ १६ जून रोजी झालेले तालुकानिहाय पर्जन्यमान तसेच १ ते १६ जूनपर्यंत झालेले एकूण पर्जन्यमान (तालुकानिहाय) पुढीलप्रमाणे आहे. (आकडेवारी मि. मी.मध्ये) लातूर (८.१३, १४२.९०), औसा (५.१४, १०७.१६), रेणापूर (१०.५०, १०६.५०), अहमदपूर (१०.१७, १४०.५०), चाकूर-(३.४०, ८१.२०), उदगीर- (६.००, १२४.७२), जळकोट- (१२़००, १२१.००), निलंगा-(४.६३, ८९.२८), देवणी- (१.००, ११४.६७) व शिरूर अनंतपाळ- ं(१.६७, ११५.३५) मि. मी. आहे. लातूर जिल्ह्याची १ जून ते ३१ आॅक्टोबरपर्यंतच्या पर्जन्यमानाची वार्षिक सरासरी ही ७९१.६० मि. मी. असून आजपर्यंत झालेला पाऊस ७२.२१ टक्के इतका असून वार्षिक सरासरीच्या १४.४४ टक्के आहे.