21.1 C
Latur
Tuesday, March 9, 2021
Home लातूर जळकोट तालुक्यातील २७ ग्रापंचायतींना हिरवे कार्ड

जळकोट तालुक्यातील २७ ग्रापंचायतींना हिरवे कार्ड

एकमत ऑनलाईन

जळकोट : जळकोट तालुक्यातील ग्रामपंचायती नागरीकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यास असमर्थ ठरतात त्यामुळे जळकोट तालुका आरोग्य विभागाच्या वतीने तालुक्यातील अतनूर व वांजरवाडा प्राथमिक अरोग्य केंद्रातंर्गत येणा-या ४४ ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या व्यवस्थेची तपासणी करण्यात आली.

आरोग्य विभागाच्या चाचणीत जळकोट तालुक्यातील कोणतेही गाव नापास झाले नाही. तालुक्यतील २७ ग्रामपंचायतींना ग्रीन (हिरवे) कार्ड देण्यात आले आहेत. तर १६ ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड देण्यात आले आहे. यावर्षी मात्र एकाही
ग्रामपंचायतीस रेड कार्ड देण्यात आले नाही.तसेच जळकोट नगरपंचायतीलाही पिवळे कार्ड देण्यात आले आहे, अशी माहिती तालुकाआरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे व विस्तार अधिकारी तम्मलवाड यांनी दिली.

तालुक्यातील कोळनूर, लाळी (बु), लाळी (खु), बेळसांगवी, वांजरवाडा, होकर्णा, उमरदरा, केकतशिंदगी, जगळपूर, चेरा, धामणगाव, ढोरसांगवी, विराळ, पाटोदा (बु), गव्हाण, अतनूर , चिंचोली, शिवाजीनगर, गुत्ती, सुल्लाळी, घोणसी, तिरूका, डोंगरगाव, माळहिप्परगा, पाटोदा(खु), करंजी या गावांना हिरवे कार्ड देण्यात आले आहे. मंगरूळ, हावगरा, येलदरा, उमरगा, शेलदरा, वडगाव, कुणक, सोनवळा, हळदवाढवणा, मेवापूर, रामपूरतांडा, कोनाळी, मरसांगवी, रावणकोळा, एकुर्का , बोरगाव, या गावांना हिरवे कार्ड देण्यात आले आहे.

ब्लीचिंग पावडरचा वापर न करणे, पावडर उपलब्ध असूनही वापर न करणे, गावात वॉल्वगळती व नळगळती असणे, हातपंपाभोवती सिंमेंट कट्टा नसणे, हातपंप, सार्वजनिक विहीर यांच्यापासून ५० फुट अंतरावर उर्कडे असणे, पाणी पिण्यास योग्य नसलेल्या जलस्त्रोताच्या ठिकाणी हे पाणी पिण्यास अयोग्य आहे असा फलक न लावणे, ग्रामपंचायतीत प्रशिक्षित कर्मचारी नसणे, आदी बाबी आरोग्य विभागासतपासणीत आढळून आल्या तर गावांना रेडकार्ड देण्यात येतात. पंरतु अनेक ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठ्यासंबधी योग्य काळजी घेतल्यामुळे ही गावे आरोग्य विभागाच्या परिक्षेत पास झाली आहेत.

सुशांतवर सफेद जादूने केले उपचार ; सुशांत केसमध्ये एका गूढ आध्यात्मीक बाबाची एंट्री

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,444FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या