32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeलातूरमूग भुईसपाट, आळ्यांनी सोयाबीनची लावली वाट

मूग भुईसपाट, आळ्यांनी सोयाबीनची लावली वाट

एकमत ऑनलाईन

संजय सगरे औसा : औसा तालुक्यात १३ ऑगस्टपासून सततधार पावसामुळे आणि वादळ वा-यामुळे शेतक-याच्या शेतातील खरीप मुगाचे पीक भुईसपाट झाले असून मुगावर हळद्या रोगाचा मारा झाल्याने पीक हातातून गेले होते. काही शेतक-यांनी फवारणी करून पीक वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु आठवडाभरातील पाऊस आणि वा-यामुळे मुगाचे पीक भुईसपाट होऊन मुगाला मोड फुटून हाताशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे तर सोयाबीनवर चक्रीभुंगा आणि उंट आळीने हल्ला केल्याने सोयाबीनच्या शेंगा कातरल्या जात आहेत.

यावर्षी मृग नक्षत्रात मान्सून पूर्व पावसाची सुरुवात झाल्याने पिके समाधानकारक आली होती .अनेक शेतक-यांना सोयाबीन बियाणे बोगस मिळाल्याने दुबार पेरणीच्या संकटचा सामना करावा लागला. कोरोना विषाणूच्या संकटाला तोंड देत बळीराजाने दुबार पेरणी केली, खुरपणी _कोळपणी करीत पोटच्या लेकरा प्रमाणे पिकाचे संगोपन केले परंतु मागील आठ दिवसांपासून संततधार पाऊस लागला असून आठवड्यापासून सूर्यदर्शन नाही, भीज पावसामुळे सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाला, मुगाचे पीक भुईसपाट झाले असून हातातोंडाशी आलेला शेतक-यांचा घास निसर्गाच्या कोपामुळे हिरावला गेला, आषाढ आणि श्रावण महिन्यातील सणासुदीचे दिवस असल्याने शेतक-यावर आता पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

औसा तालुक्यात संपूर्ण सोयाबीनवर चक्रीभुंगा आणि उंट आळीमुळे पिकाची नासाडी झाली आहे. खरिपाचे नगदी पीक म्हणून शेतकरी वर्गाला सोयाबीनचा मोठा आधार असतो परंतु दैवाने दिले आणि कर्माने नेले अशी अवस्था शेतकरीवर्गाची झाली आहे सतत नैसर्गिक संकटाशी तोंड देणा-या शेतक-यांना पुन्हा नैसर्गिक आपत्तीने ग्रासले आहे. शेतकरी सध्या आर्थिक कोंडीत सापडला असून थकबाकीदार शेतक-यांचे कर्ज माफ झाले परंतु चालू बाकीदार शेतक-यांना शासनाने जाहीर केलेले प्रोत्साहन अनुदानही अद्याप गुलदस्त्यात आहे, बळीराजावर निसर्ग कोपला असून चोहोबाजूने संकटात सापडलेला शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

नांदेड परिमंडळातील ५२७२ शेतक-यांचे दिवसा विजेचे स्वप्न पुर्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या