31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeलातूरलातूर शहरात ग्रीन लातूर वृक्ष टिमने ४००८० झाडे लावली

लातूर शहरात ग्रीन लातूर वृक्ष टिमने ४००८० झाडे लावली

एकमत ऑनलाईन

लातूर : राज्याचे वैद्यकीय, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनांतर्गत लातूर शहरात २०१५ पासुन कार्यरत असलेली लातूर वृक्ष ही सामाजिक चळवळीने १ जुन २०१५ ते ३० मे २०१९ या काळात १८००० झाडे लावली होती. यानंतर ग्रीन लातूर वृक्ष टिमने १ जुन २०१९ ते १८ ऑक्टोबर २०२० या ५०५ दिवसात अभुतपुर्व असे काम करत ४००८० लहान मोठी झाडे लावली आहेत.

लॉकडाऊनच्या १०० दिवसांत या ग्रीन लातूर वृक्ष टिमच्या सदस्यांनी २२०० मोठी झाडे लावली. एक घर एक झाड, एक महिला एक झाड, एक नळ एक झाड ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत या सदस्यांनी अविरत ५०५ दिवस काम केले आणि करत आहेत. नुसती झाडे लावून सोडुन न देता सर्व झाडे टॅकरने पाणी देऊन जगविली. २०२० च्या उन्हाळ्यात या टिमने २८० लहान मोठ्या टॅकर पाण्याचा वापर करत शहराच्या गल्लीबोळातील सर्व झाडे जगविली. या टिमने १ जुन २०१९ ते १८ ऑक्टोबर २०२० या ५०६ दिवसात एकही दिवस खंड न पाडता अविरत वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनाचे सातत्यपुर्ण कार्य केले आहे. लॉकडाऊन मध्येही दररोज न चुकता काम सुरु होते. दररोज सकाळी ६ ते ९ या तीन तासात खड्डे खोदणे, झाडे आणणे, झाडांना पाणी देणे, झाडांना काठ्या बांधणे अशी सर्व कामे श्रमदानातून केली. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय.

महानगरपालिका लातूरच्या २२ ग्रीन बेल्टमधील झाडे जगवली. भविष्यात झाडांद्वारे शुध्द हवा मिळावी या हेतूने २६ ठिकाणी दाटीवाटीने झाडे लावून ग्रीन ऑक्सीजन झोन तयार केले व ते जोपासले. घनदाट अरण्य या संकल्पनेतून ६ मियावाकी प्रकल्प सुरु केले, पुर्णत्वास नेले. शहरातील सहा मुख्य चौकात शोभिवंत झाडे लावून त्यांचे सुशोभीकरण केले. भुयारी मार्गात शोभीवंत झाडांच्या १५० कुंड्या ठेवल्या आहेत. शहरातील दुभाजक, जिल्हा क्रीडा संकुल, बसस्थानक, विविध शाळा महाविद्यालये, रस्ता दुतर्फा स्मशानभुमी अशा सर्व ठिकाणी ही ग्रीन वृक्ष टिम झाडे लावून झाडे जोपासत असत आहे.

शहरात प्रथमच पक्षांकरीता ११० फळांची झाडे असलेले निसर्ग पक्षी उद्यान सुरु केले. फुलपाखरांचे संवर्धन होण्याकरीता फुलपाखरांना आकर्षीत करणारी रंगबिरंगी १६० विविध फुलझाडे लावून बटरफ्लाय उद्यान बनविण्यास सुरुवात केली आहे. उन्हाळ्यामध्ये पक्षांना खाण्याकरीता शहरात ठिकठिकाणि २०० बर्ड फिडर लावण्यात आली होती. गणेश उत्सवानिमित्ताने एका वृक्षाला गणपतीचे रुप देउन २००० चिंचेच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. आषाधी एकादशीदिवशी ३०० फळांच्या झाडांचे वारकरयांना मोफत वाटप करण्यात आले. याप्रमाणे गेल्या ५०० दिवसात ३९६०० लहान मोठी झाडे लावून ७००० पेक्षा जास्त झाडांचे इतरांना मोफत वाटप करण्यात आले. शेकडो झाडांना लोखंडी -प्लास्टिक जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. १० हजार सीड बॉल कित्येक ठिकाणी रोपणार्थ फेकण्यात आले. महिला बचत गटांना ६०० शेवगा झाडे मोफत वाटप करण्यात आली.

वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनाच्या या चळवळीमध्ये ग्रीन लातूर वृक्ष टिमचे समन्वयक डॉ. पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, अभिजीत देशमुख, डॉ. भास्कर बोरगावकर, डॉ. कल्याण बरमदे, पद्माकर बागल, संगमेश्वर बोमणे, डॉ. रमेश भराटे, अ‍ॅड. वैशाली लोंढे, डॉ. संतोष बजाज, डॉ. नंदकुमार डोळे, सचिन क्षीरसागर, मिर्झा मोईज, जफर शेख, कल्पना फरकांडे, पुजा निचळे, सुलेखा कारेपुरकर, शैलेश सुर्यवंशी, गंगाधर पवार, सुहास पाटील, प्रमोद निपानीकर, मनमोहन डागा, नगरसेविका श्वेता लोंढे, स्वाती यादव, प्रफुल्ल पाटील, कल्पना कुलकर्णी, ऋषिकेश दरेकर, हितेश डागा, चैतन्य प्रयाग, डॉ. शैलेश पडगीलवार, सार्थक शिंदे, ऋषिकेश पोद्दार, द्वारकादास बिदादा, सचिन चांडक, एस. पी. मुंडे, सतिष सातपुते, ओमप्रकाश झुरळे, अभिनव शहा, डॉ. मुश्ताक सय्यद.

सोनु डगवाले, सिकंदर पटेल, विकास कातपुरे, सिताराम कनजे, नामदेव सुब्बनवाड. डॉ. मंजुषा कुलकर्णी, संजय जमदाडे, डॉ. शांतीलाल शर्मा, डॉ. जयंत पाटील, आशिष सुर्यवंशी, महेश गिल्डा, लक्ष्मीबाई बटनपुरकर, सीमा धर्माधिकारी, विमल रेड्डी, नागेश स्वामी, प्रसाद शिंदे, महेश कदम, अ‍ॅड. सर्फराज पठाण, प्रसाद शिंदे, प्रसाद जाधव, संकेत कुलकर्णी, अ‍ॅड. व्यंकटेश बेल्लाळे, शुभम आवाड, मोहिनी वळखांबे, शुभम अट्टल, संकेत कुलकर्णी, महेश पाटील, प्रसाद जाधव, प्रसाद श्रीमंगले, महेश भोकरे, सर्फराज पठाण, खंडेराव गंगणे, वंजारे कृष्णा, राहुल कुचेकर आणी इतर सर्व सदस्य झाडे आणणे, खड्डे खोदणे, झाडे लावणे, झाडांना काठ्या बांधणे, झाडांना पाणी देणे याकरीता परिश्रम घेत आहेत. संगम हायटेक नर्सरी, ग्रीन वर्ल्ड नर्सरी, श्रध्दा नर्सरी, प्रेरणा नर्सरी, कर्वा नर्सरी यांचे बहुमोल सहकार्य लाभते.

नुकसानग्रस्त झालेल्या भागाची आ. पाटील यांच्याकडून पाहणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या