25.5 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeलातूरपालकमंत्र्यांनी घेतला कोविड-१९ लसीकरण मोहिमेचा आढावा

पालकमंत्र्यांनी घेतला कोविड-१९ लसीकरण मोहिमेचा आढावा

एकमत ऑनलाईन

लातूर : कोविड-१९ प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर विविध आरोग्य केंद्रावर १८ वर्षावरील नागरिकांची लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत बाभळगाव, हरंगुळ बु. येथील लसीकरण केंद्रांना राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दि. ३१ जुलै रोजी भेट देऊन लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी शनिवार सकाळी बाभळगाव येथील आरोग्य केंद्रास भेट देऊन या ठिकाणी राबविण्यात येत असलेल्या कोविशील्ड व कोवॅक्सिन लसीकरण मोहिमेची पाहणी करुन संबंधित आरोग्य यंत्रणेकडून माहिती घेतली तसेच आवश्यक सूचना सबंधितांना केल्या.

यासोबतच लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यास आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, डॉ. जितेन जयस्वाल, डॉ. अरुण कदम, डॉ. मीरा चिंचोलीकर, उपसरपंच गोविंद देशमुख, सुभाष जाधव, अ‍ॅड. कैलास मस्के, सचिन मस्के यांच्यासह बाभळगाव ग्रामीण रुग्णालय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री अमित देशमुख यांनी लातूर तालुक्यातील हरंगूळ बु. येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्र या ठिकाणी सुरू असलेल्या कोविड-१९ लसीकरण केंद्रास भेट देऊन या ठिकाणी सुरु असलेल्या लसीकरण कार्यक्रमाची माहिती घेतली. तसेच या ठिकाणी लसीकरणास आलेल्या हरंगूळ बु. येथील नागरिक यांच्याशी संवाद साधत निवेदनांचा स्वीकार केला. नागरिक व आरोग्य कर्मचारी यांना कोविड-१९ प्रादुर्भाव काळात मार्गदर्शक नियमावलीचे पालन करीत काळजी घेण्याचे आवाहन केले.

यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, डॉ. दीपक मेंढेकर, डॉ. अली कुरेशी, पी.आर. शेटे, डी. टी. कांदे, सरपंच सूर्यकांत सुडे, संतोश शेळके, राम वाघमारे यांच्यासह हरंगूळ बु. परिसरातील नागरिक, आरोग्य विभाग अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

अंगणवाडीस भेट
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पा अंतर्गत हरंगूळ बु. या ठिकाणी चालणा-या अंगणवाडीला राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीत अंगणवाडीतील बालगोपाळाकडून स्वागत स्विकारत या अंगणवाडीत विद्यार्थ्याना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या शैक्षणिक सुविधांचे कौतुक केले. तसेच अंगणवाडी महिला कर्मचार्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, बंडगर बी. एम, श्रीमती एस. बी. देशमुख, श्रीमती ए. एच. कांबळे, श्रीमती आर. एम. माणके यांची उपस्थिती होती.

टिळक ते लोकमान्य

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या