24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूरबंदीच्या दशकपूर्तीनंतरही गुटखा तस्करी सुरुच

बंदीच्या दशकपूर्तीनंतरही गुटखा तस्करी सुरुच

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात गुटखा उत्पादन आणि विक्री करण्यास सन २०१२ मध्ये बंदी घालण्यात आली. बंदीच्या दशकपुर्तीनंतरही गुटखा तस्करी थांबली नाही. लातूर जिल्ह्यात गुटख्याची खुलेआमपणे विक्री सुरुच आहे. गुटखा खरेदी-विक्रीची वर्षाला कोट्यावधीची उलाढला आहे. कालच उदगीर तालुक्यातील हाळी-हंडरगुळी सारख्या छोट्याशा गावातून १० लाख ७० हजार रुपयांचा गुटखा, पान मसाला पोलिसांनी जप्त केला. यावरुन गुटख्याच्या तस्करीचा अंदाज संबंधीत यंत्रणेला येणे आवश्यक आहे. चोरट्या मार्गाने गुटखा आणुन खुलेआमपणे विक्री होत असताना याकडे नेमके कोणाचे दुर्लक्ष आहे याचा विचार करुन ‘अ‍ॅक्शन मोड’वर येण्याची गरज आहे.

लातूर शहरासह लातूर तालुका, औसा, निलंगा, देवणी, उदगीर, जळकोट, अमदपूर, चाकुर, शिरुर अनंतपाळ, रेणापूर या दहाही तालुक्यांत गुटखा विक्री खुलेआमपणे सुरु आहे. या अवैध गुटखा विक्रीतून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. छोट्या-छोट्या गावांपर्यत या अवैध गुटख्याची साखळी आहे. लातूर जिल्हा पान, सुपारी, गुटखा शौकीनांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच लातूर जिल्ह्यात मराठवाड्यात सर्वाधिक पान टप-या पहावयास मिळातात. उंचे लोगों की उंची पसंद…आता अवैध गुटखा विक्रीपर्यंत गेली आहे. नाना प्रकारचे पान मसाले, गुटखा सर्रासपणे विक्रला जातो आहे. चोरट्या मार्गाने होणारी गुटख्याची अवैध विक्री बिनधास्तपणे होत असते. कधी कधी पोलीस किंवा अन्न व औषध प्रशासनाला अवैध गुटख्याची गुप्त माहिती मिळते आणि संबंधीत विभाग अशा ठिकाणी छापे टाकतो तेव्हा जप्त केलेला माल अवाक करणाराच असतो.

सर्वाधिक प्रामाणिकपणा कुठे असेल तर तो दोननंबरच्या व्यवसायात असे सर्वचन मान्य करतात आणि त्यामुळेच गुटखा विक्रीचा अवैध व्यवसाय कोट्यावधीत खेळतो आहे. संबंधीत यंत्रणेने अनेकवेळा अवैध गुटख्याच्या गाड्या पकडल्या असल्या तरी अजूनही त्यावर पाहिजे तसे नियंत्रण नाही. कारण तपासणी नाक्यावरुन गाडी पास झाल्यानंतर पुढे चेकींगची प्रभावी व्यवस्था नसल्याचे म्हटले जाते. त्यामुळे पोलिसांना केवळ संशय, गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारेच कारवाई करावी लागते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या