24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरसमूहगीत गायन स्पर्धेत ‘ज्ञानप्रकाश’ संघाची यशस्वी घोडदौड

समूहगीत गायन स्पर्धेत ‘ज्ञानप्रकाश’ संघाची यशस्वी घोडदौड

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
भारत विकास परिषदद्वारा आयोजित चेतना के स्वर ही समूहगीत गायन स्पर्धा भालचंद्र ब्लड बँकेत झाली. लातूर शहरातील तब्बल १५ शालेय संघानी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. त्यात ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र, लातूरच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावित पुन्हा एकदा वर्चस्व स्थापित केले. कुमुदिनी भार्गव, मनपा उपायुक्त मयुरा शिंदेकर, सुनील देशपांडे आदी मान्यवरांच्या व गुरुवर्य परीक्षकांच्या हस्ते पाच हजार रोख रक्कम, फिरता चषक, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

पैठण येथे होणा-या प्रांत स्तरीय स्पर्धेसाठी ज्ञानप्रकाशच्या गटाची निवड झाली आहे. या संघात कुंजन बिराजदार, रेणुका वाडीकर, अनुजा कुलकर्णी, सृष्टी मुळे, वैष्णवी खरोसे, गौरवी नाईकनवरे, सृष्टी परळे, हर्षदा डोंगरे या विद्यार्थींनींचा सहभाग होता.’ज्ञानप्रकाश’ चे संगीत शिक्षक विश्वजीत पांचाळ यांनी मार्गदर्शन केले तर मयूर येनगे आणि निलेश पाठक यांनी साथसंगत केली. ज्ञानप्रकाश प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख सतीश नरहरे व प्रकल्पाच्या संचालिका व मुख्याध्यापिका सविता नरहरे, सर्व शिक्षक व पालक यांनी संघाचे कौतुक आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या