18.6 C
Latur
Thursday, February 2, 2023
Homeलातूर‘हाथ से हाथ जोडो अभियान’ राज्यात लातूर पॅटर्न बनावा

‘हाथ से हाथ जोडो अभियान’ राज्यात लातूर पॅटर्न बनावा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने दिलेला कोणताही कार्यक्रम माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूरच्या काँग्रेसने आजपर्यंत यशस्वी करुन दाखविलेला आहे. आता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने भारत जोडो यात्रेचा ‘हाथ से हाथ जोडो अभियान’ हा विस्तारित कार्यक्रम दिला आहे. हा कार्यक्रमही लातूरच्या काँग्रेसने यशस्वी करुन राज्यात लातूर पॅटर्न घडवावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसेच सरचिटणीस तथा लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक जितेंद्र देहाडे यांनी व्यक्त केली.

हाथ से हाथ जोडो अभियानासंदर्भात दि. २४ जानेवारी रोजी काँग्रेस भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसेच सरचिटणीस तथा लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक जितेंद्र देहाडे यांनी आढावा बैठक घेतली. त्याप्रसंगी बोलताना देहाडे यांनी उपरोक्त अपेक्षा व्यक्त केली. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोईज शेख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय साळूुंके, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सपना किसवे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा प्रा. डॉ. स्मिता खानापूरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना देहाडे म्हणाले, अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी अनेक सूचनांचे विमोचन केले. इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रेस मीडिया यावर अंकुश आणण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून होत असताना आपण समाज माध्यमाद्वारे आणि जनतेला संवाद साधत जनतेच्या प्रश्नांना समजून घेऊन मार्ग काढण्यासाठी ‘हाथ से हाथ जोडो अभियान’ महत्त्वाचे ठरणार आहे. सर्व कार्यकर्त्यांनी या अभियानामध्ये सामील होत हे अभियान महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त यशस्वी करावे, असे आवाहन केले.

प्रदेश सरचिटणीस मोईज शेख यांनी भाजपच्या आठ वर्षाच्या अयशस्वी कारभाराचा पाढा वाचून दाखवत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. देशाला राहुल गांधी यांच्या सक्षम नेतृत्वाची गरज आहे, काँग्रेसचा सर्वधर्म समभाव हाच विचार या देशाला महासत्ता बनवू शकतो. त्यामुळे हे अभियान आपण सर्वांनी यशस्वीपणे राबवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रदेश सचिव अभय साळुंके यांनी आपल्या मनोगतात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत लातूरने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल माहिती देत हात से हात जोडो अभियान हे अभियान या यात्रेच्या कार्याला मूर्त रुप देण्यासाठी महत्त्वाचे असून यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रास्ताविकात अ‍ॅड. किरण जाधव यांनी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित करण्यात येणा-या हाथ से हाथ जोडो अभियाना संदर्भात सविस्तर माहिती दिली. अभियान लातूर शहरात माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या नियोजनात लातूर शहरात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार असून, सर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष सर्व माजी नगरसेवक प्रभाग अध्यक्ष कार्यकारणी सदस्य आणि पदाधिकारी तसेच कार्यकर्ते या अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याचे सांगीतले.

या बैठकीस जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पृथ्वीराज सिरसाठ, प्रा. प्रवीण कांबळे, ज्ञानेश्वर सागावे, असिफ बागवान, प्रा. राजकुमार जाधव, अ‍ॅड. देविदास बोरुळे पाटील, प्रविण सूर्यवंशी, धनंजय शेळके, कैलास कांबळे, बाळासाहेब देशमुख, युनूस मोमीन, हमीद बागवान, वर्षाताई मस्के, सुलेखा कारेपुरकर, महेश काळे,सचिन मस्के, नामदेव इगे, प्रा. एम. बी. पठाण, अ‍ॅड.अंगदराव गायकवाड कमल मिटकरी, तबरेज तांबोळी, नागसेन कामेगावकर, निजामुद्दीन शेख, विकास कांबळे, ख्वॉजाभाई शेख, गिरीश ब्याळे, सुनीत खंडागळे, रत्नदीप अजनीकर, विकास वाघमारे, विजय गायकवाड, धनंजय शेळके, सुंदर पाटील कव्हेकर, अमित जाधव, बाबा पठाण, शेख अब्दुल्ला, करीम तांबोळी, अभिजीत इगे, अभिषेक पतंगे, अकबर माडजे, बालाजी झिपरे, विष्णुदास धायगुडे, बिभीषण सांगवीकर, जाफर शेख, जहीर शेख, अमन सय्यद, मीनाताई टेंकाळे, सुमन चव्हाण, शिलाताई वाघमारे, ज्योती सिंघम, किरण बनसोडे, धनराज गायकवाड, अनिल शिंदे, अमोल गायकवाड, आनंद वैरागे, दयानंद कांबळे, विजयकुमार धुमाळ, फादर सुभान रकटे, लोखंडे मनोज, शेख कालुभाई, हाजी मुस्तफा, लक्ष्मी बटनपूरकर, श्रावण मस्के, राजू गवळी, काशिनाथ वाघमारे, बब्रुवान गायकवाड, इलाही सौदागर, राजाभाऊ गायकवाड, पिराजी साठे, नागनाथ डोंगरे, संजय सुरवसे, गौतम मुळे, किशोर मोरे, लतेश आवटे, हणमंत मादळे, रामकीशन शिंदे, पवनकुमार गायकवाड, शेख फारुख, भाऊसाहेब भडिकर,अभिषेक देशमुख, संजय पाटील खंडापूरकर, दिनेश रायकोडे, महेश नागलगावे, शेख जुनेद, अराफत पटेल, महेश शिंदे, सुमित भडिकर, फैजलखान कायमखानी आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन महेश कोळ्ळे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष दगडू आप्पा मिटकरी यांनी मांडले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या