निलंगा : प्रतिनिधी
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने भारत जोडो यात्रेचा ‘हाथ से हाथ जोडो अभियान’ हा वस्तिारित कार्यक्रमचा पहिल्या टप्यातील दुस-या दिवसाचा समारोप औराद शहाजनी शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरात रॅली काढून सभेच्या माध्यमातून जनतेशी सवांद साधून पार पडला . या सवांदादरम्यान औरादकरणी लोकनेते विलासराव देशमुख व स्व शिवाजीराव पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत औराद हे नेहमी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले आहे व इथून पुढही राहील असा विश्वास औराद ग्रामस्थानानी केला
.यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके, काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष सुधाकर पाटील, निलंगा तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, मोहनराव भंडारे, कार्याध्यक्ष अॅड नारायन सोमवंशी, लातूर जिल्हा डॉ. सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.अरंिवद भातम्बरे, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष लाला पटेल, निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने, चक्रधर शेळके, नूर पटेल, रजाकभाई नाईकवाडे, माधवराव पाटील, निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे, मंगेश चव्हाण, बाळासाहेब देशमुख, बबलू जाधव,अभय शर्मा, पद्मंिसह पाटील, हाजी सराफ, निलंगा तालुका युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मदन बिरादार, निलंगा तालुका काँग्रेस सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे,अभय शर्मा, भारत बियाणी,रवींद्र गायकवाड आदीसह पदाधिकारी ,कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.