23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeलातूरजळकोट तालुक्यात हरणांचा कोवळ्या पिकांत हैदोस

जळकोट तालुक्यात हरणांचा कोवळ्या पिकांत हैदोस

एकमत ऑनलाईन

जळकोट : ओमकार सोनटक्के
जळकोट तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे, शेतक-यांच्या पुढचे दुबार पेरणीचे संकट दूर झाले म्हंटले तर आता पेरलेले उगवले परंतु हे उगवलेले पीक शेकडोंच्या संख्येने हरीण फस्त करत आहेत. यामुळे शेतक-यांपुढे हरणाच्या रूपाने नवीनच संकट ओढवले आहे. जळकोट तालुक्यातील शेतकरी हे पूर्णपणे खरीप हंगामावर अवलंबून असतात या हंगामात चांगला पाऊस झाला आणि चांगली पिके आली तर शेतकरी चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो, परंतु गत तीन ते चार वर्षापासून शेतक-यांना कधी अवर्षण तर कधी अति पाऊस यामुळे शेतीमधील उत्पन्न अतिशय कमी मिळत आहे, यामुळे सद्यस्थितीत तालुक्यातील शेतकरी अतिशय आर्थिक संकटात सापडला आहे.या वर्षीचा खरीप हंगाम चांगल्या पद्धतीने होईल, अशी अपेक्षा शेतक-यांंना होती परंतु तीही आता फोल ठरली आहे कारण शेतक-यांंनी मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे पेरण्या आटोपुन घेतल्या परंतु अनेक शेतक-यांना बियाणांमुळे प्रचंड त्रास झाला तर तालुक्यातील अनेक भागात सध्या पाऊस नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. अनेक शेतक-यांंची बियाणेबरोबर उगवत नाहीत अशी तक्रार आता येऊ लागली आहे.

जळकोट तालुक्यातील शेतक-यांंनी पेरणी केली. यानंतर ब-यापैकी पाऊस झाला यामुळे पिकांची उगवण झाली परंतु वन्यजीव प्राण्यांमुळे शेतकरी आता मेटाकुटीस आला आहे. शेतक-यांच्या शेतामध्ये शेकडोच्या हरणाचा कळप एका वेळीच दाखल होत आहे तसेच शेतामधील पीक खाऊन फस्त करत आहे. या हरणांना राखण्याची वेळ शेतक-यावर आली आहे, अनेक शेतक-यांंनी आपल्या शेतामध्ये बुजगावणे लावले आहेत परंतु या बुजगावण यालादेखील हरिण भीत नाहीत. शेतक-यांंना स्वत: सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपले पीक हरणापासून वाचवावे लागत आहे. तसेच हरणा व्यतिरिक्त रान डुकरे, वानर, मोर, याचाही त्रास शेतक-यांंना होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या