30.8 C
Latur
Friday, March 5, 2021
Home लातूर शिरुर ताजबंद जुन्या गावातील हनुमाननगर सील

शिरुर ताजबंद जुन्या गावातील हनुमाननगर सील

एकमत ऑनलाईन

या तालुक्यातील शिरूर ताजबंद येथुन नेलेल्या स्कॅबचा अहवाल रविवारी आला त्यात एक जणाचा कोरोना पॉझिटीव्ह आला त्यामुळे हनुमाननगर सील करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल सारोळे, डॉ.मारोती पाटील यांनी दिली.

शिरूर ताजबंद येथे कोरोना संसर्गजन्य व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून त्या सोबतच कंन्टेंटमेट झोनचे क्षेत्रही वाढत आहे. रविवारी आलेल्या अहवालामध्ये एक जणाचा कोरोना पॉझीटीव्ह आला आहे. पॉझीटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील दोघांना रविवारी मरशिवणी येथील संस्थात्मक क्वारंनटाईन केले.

या कामी तलाठी नवणित जामणिक, कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत सदस्य विक्रम भोसले, रणधीर पाटील, पोलीस कर्मचारी, फुलेवाड,तौफिक किनीवाले, चांद किनिवाले , एम,डी,शेख आशा कार्यकर्ती शितल महागावे ,आरोग्य कर्मचारी ंिशदे परिश्रम घेत आहेत.

Read More  जिल्हा परिषद सीईओची विविध ठिकाणी भेट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,440FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या