24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरहासोरी गावची शास्त्रज्ञांनी केली पाहणी

हासोरी गावची शास्त्रज्ञांनी केली पाहणी

एकमत ऑनलाईन

निलंगा : गेल्या काही दिवसांपासून निलंगा तालुक्यातील हासोरी व परिसरातील काही गावात भूगर्भातून भूकंपसदुश आवाजाने नागरिक भयभीत झाले असून या संपूर्ण घटनेची माहिती घेण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भूगर्भ विभागाचे तीन सदस्यीय चमुने या गावाचा दौरा करून पाहणी करून यासंदर्भात नागरिकांशी सवस्तिर चर्चा केली.

निलंगा तालुक्यातील हासोरी याठिकाणी भूकंपसदृश आवाजाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना संबंधित घटनेची माहिती आमदार अभिमन्यू पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ श्ािंदे यांना दिली. तसेच फोनवरून लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. तसेच राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्याशी यासंदर्भात बोलणे करून दिले होते. यानुसार जिल्हाधिकारी व भूकंप वेधशाळा हवामान शास्त्रज्ञ लातूर येथील वरिष्ठ पुजन सर्वेक्षण विभागाने पाहाणी केली. यानंतर दि.१४ सप्टेंबर रोजी आमदार अभिमन्यू पवार यांनी भूगर्भ शास्त्र प्रा. विजयकुमार मिश्रा, पर्यावरण शास्त्रज्ञ प्रा. अविनाश कदम व प्रा अर्जुन भोसले यांच्या तीन सदस्यीय चमुने हासोरी (बु) व हासोरी (खु) या गावाची पाहाणी केली.

यावेळी नागरिकांशी संवाद साधताना आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले की, भूकंप आपत्ती व्यवस्थापनाच्या दुष्टीने उपाययोजना करण्यासाठी आवश्यक ती बाबींचा विचार केला जात आहे. या सर्व परिस्थितीची माहिती मी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार आहे.भूकंप आपत्तीप्रवण क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या सुविधा या भागात उभारण्यासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही ग्रामस्थांना त्यांनी दिली. मागच्या काही दिवसांपासून भूकंपाच्या भीतीखाली जगत असलेल्या ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तज्ञांच्या चमूने पाहणीनंतर आपत्कालीन परिस्थितीत काय काळजी घ्यावी याचे सखोल मार्गदर्शन केले तसेच ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, तहसीलदार सुरेश गोळवे, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, सहाय्यक पोलिस निरीक्षक ढमाले, तालुका कृषी अधिकारी काळे, नायब तहसीलदार महापुरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

हासोरीत २ रिश्टर स्केलचा भूकंप
हासोरी येथे संशोधकांनी भेट दिल्यानंतर त्यांनी भूकंपाचे अनुमान व्यक्त केले आहे. हासोरी येथे २ रिश्टर स्केलचा भूकंप झाला असल्याचे संशोधक अभ्यासकानी मत व्यक्त केले आहे. प्रशासनिक स्तरावर नागरिकांनी घ्यावयाची काळजी निर्गमित केली आहे. यासाठी गाव स्तरावर अपत्ती व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमार्फत गावातील मोडकळीस आलेल्या घरांचे सर्व्हेेक्षण करणे, ग्रामपंचायतीमार्फत नोटीस देऊन दुरुस्ती करणे, पत्र्याच्या घरावर ठेवलेले मोठे दगड काढून घेणे, तारेच्या साह्याने बांधणी करणे, घरास दिलेले विजेचे कने्शन सुरक्षीत आहे का याची पाहणी करणे, घरातून बाहेर पडण्याच्या मार्गातील अडथळे दूर करणे, कच्चा घरातील नागरिकांची व्यवस्था मंदिर, शाळा या ठिकाणी करणे, गावात स्वयंसेवक तरुणांचे गट निर्माण करणे, आपत्तीत लागणारे साहित्य ग्रामपंचायतीने सज्ज ठेवणे आदी कामे अपत्ती व्यवस्थापन समितीने करणे आपेक्षीत असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या