17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeलातूरधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

एकमत ऑनलाईन

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा

लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी वेगवेगळ््या ठिकाणांहून ५२६ जणांचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी सायंकाळी ७ पर्यंत ३५२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर ५८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक २५ रुग्ण लातूर शहरातील आहेत, तर अहमदपूर तालुक्यात ८, निलंगा तालुक्यात ७ आणि उदगीर, औसा आणि देवणी तालुक्यात प्रत्येकी ६ रुग्ण आढळले आहेत. यातील ४९ रुग्ण पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील, तर ९ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. दरम्यान, तब्बल ७२ जणांचा अहवाल अनिर्णित असून, १९ जणांचा अहवाल प्रलंबित, तर २५ जणांचा अहवाल नाकारण्यात आला आहे.

कोणत्या भागात सापडले रुग्ण

लातूर जिल्ह्यात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. गुरुवारी जिल्ह्यात एकूण ५८ रुग्ण आढळून आले. त्यात लातूर शहरातील २५ रुग्ण असून, साईधाम, बोधेनगर, केशवनगर, गिरवलकरनगर, राजीएमसी रोड या भागात अधिक रुग्ण सापडले असून, नावंदर गल्ली, देसाईनगर, बसवेश्वर चौक, सराफनगर, आनंदनगर, हाजेनगर, नारकेनगर, आनंदनगर, हरंगूळ आदी भागातही रुग्ण आढळले आहेत. यासोबतच अहमदपूर तालुक्यात शहरासह शिरुर ताजबंदमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. तसेच भाकरवाडीतही रुग्ण सापडला आहे. निलंगा येथेही ७ नवे रुग्ण सापडले असून, बसवेश्वरनगर, पोस्टआॅफीसजवळील रुग्णांसह औराद शहाजानी येथील रुग्णांचा समावेश आहे. देवणी, औसा आणि उदगीर तालुक्यात प्रत्येकी ६ रुग्ण सापडले असून, देवणी तालुक्यातील सर्व रुग्ण हंचनाळ येथील आहेत. औसा येथेही खडकपुरा, खानंदक गल्लीसह तालुक्यातील कोरंगळा, फत्तेपूर येथील रुग्ण आहेत, तर उदगीर तालुक्यात शहरातील गांधीनगर, जळकोट रोडवरील रुग्णासोबतच नळगीर, झरी, डोंगरशेळकी येथील रुग्ण आहेत.

५८ पैकी तब्बल ४९ रुग्ण पॉझिटिव्हच्या संपर्कातील

लातूर जिल्ह्यात गुरुवारी ५८ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यातील तब्बल ४९ रुग्ण हे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील आहेत, तर ९ रुग्ण नवे आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने संपर्क कमी होऊन रुग्णाचे प्रमाण घटण्यास मदत होईल, असे सांगितले जात आहे.

पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ९१० वर

जिल्ह्यात गुरुवारी आणखी ५८ रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील आतापर्यंतची कोरोना रुग्णसंख्या ९१० पर्यंत पोहोचली आहे. यातील ३९९ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून, आतापर्यंत बरे झालेल्या ५११ रुग्णांना सुटी मिळाली आहे, तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी ३६७ जणांची सौम्य लक्षणे असून, २३ जण आॅक्सिजनवर आहेत, तर ९ जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

Read More  बिबट्याची 4 पिले सापडली : दररोज त्यांच्या आईची वाट पाहणं सुरु होतं…

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या