18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeलातूरदेवणी येथे घरात घुसून काठीने, कत्तीने मारहाण

देवणी येथे घरात घुसून काठीने, कत्तीने मारहाण

एकमत ऑनलाईन

देवणी : देवणी येथे मागील भांडणांची कुरापत काढून घरात घुसून मिरची पुड अंगावर फेकून काठीने व कत्तीने मारुन जखमी केले. या प्रकरणी तब्बल दोन महिन्यानंतर मंगळवार दि.१२ ऑक्टोबर रोजी रात्री ६ वाजण्याच्या सुमारास देवणी पोलीस ठाण्यात सहा जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवणी येथे दि.१३ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरी नमूद आरोपीनी गैरकायदयाची मंडळी जमवून फिर्यादीस देवणी येथील रंडाळे यांच्या पाणी प्लॅटवर झालेल्या भांडणाच्या कारणावरुन फिर्यादीच्या घरात शिरुन फिर्यादी व त्याचे आई, वडील, पत्नी यांच्यावर मिरची पुड फेकून फिर्यादीस काठीने पाठीत मारुन मुक्का मार दिला व फिर्यादीच्या वडीलास कत्तीने डाव्या पायावर मारुन जखमी केले.

फिर्यादीच्या पत्नीस व आईस काठीने मारहाण करुन मुक्कामार दिला तसेच शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी भीम नारायण पतंगे राहणार देवणी यांच्या फिर्यादीवरून देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३०१/२०२२ कलम ४५२, ३२४, ३३६, २९४, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, ५०६ भादवी प्रमाणे चंद्रकांत राजाराम पतंगे, संतोष चंद्रकांत पतंगे, अभिलाश चंद्रकांत पतंगे, सुजीत चंद्रकांत पतंगे, देवीदास राजाराम पतंगे, कमलाकर राजाराम पतंगे सर्व राहणार देवणी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल व्ही.एस.कांबळे हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या