21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeलातूरजळकोट तालुक्यात पुन्हा जोरदार पाऊस

जळकोट तालुक्यात पुन्हा जोरदार पाऊस

एकमत ऑनलाईन

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यामध्ये दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. दि. २२ जूनच्या रात्री जळकोट तालुक्यातील सर्व गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. यामुळे या सतत होणा-या पावसामुळे पिकांना मोठा फटका बसणार असून यामुळे शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

जळकोट तालुक्यामध्ये सलग दोन आठवड्यापासून पाऊस सुरू आहे. कधी रिमझिम तर कधी मुसळधार पावसामुळे शेतातील ओलावा कमी होताना दिसून येत नाही. यामुळे याचा परिणाम पिकांच्या वाढीवर होत आहे. सतत पडणा-या पावसामुळे शेतीमध्ये मोठया प्रमाणात तण झालेले आहे. यामुळे या तनाखाली पीक झाकून गेलेले आहे. याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. आज जरी पाऊस उघडला तरीही सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

जळकोट तालुक्यामध्ये जळकोट मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्हाधिका-यांनी जळकोट मंडळातील पिकांचा सर्वे करण्याचे आदेश दिले होते. सोबतच घोंशी मंडळात देखील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तसेच सरकारने जळकोट मंडळातील पिकांचे तात्काळ सर्वेक्षण करण्याची गरज आहे. सर्वेक्षण करून शेतक-यांना तातडीची मदत जाहीर करावी अशी मागणी देखील होत आहे. पावसासोबतच पिके उगवल्यानंतर शेतक-यांच्या पिकावर गवळण गाय तसेच शंखी गोगलगायनी हल्ला चढवला होता. यामुळे देखील शेतक-यांचे नुकसान झाले आहे. सलग पडणा-या पावसामुळे आता शेतकरी कंटाळला आहे. आणखीन दोन ते तीन दिवस हवामान खात्याने पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे असाच पाऊस आणखीन दोन ते तीन दिवस पडला तर मात्र मोठे नुकसान होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या