22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeलातूरपावसाचा जोर कायम; पिके पिवळी पडू लागली

पावसाचा जोर कायम; पिके पिवळी पडू लागली

एकमत ऑनलाईन

शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
शिरूर अनंतपाळ तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे.अति पावसामुळे खरीप पिके पिवळे पडू लागली तर उगवलेल्या सोयाबीनची वाढ खुंटली असून शेती तणाने व्यापली आहेत. शेतकरी फवारणीचा प्रयत्न करीत असले तरी पाऊस उघडीप देत नसल्याने खरीप हंगाम हातचे जाईल, या भितीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. निसर्गाचा लहरीपणा शेतक-याचा मुळावर आला आहे.जून महिना अखेर हलका पाऊस झाल्यावर शेतक-यांनी चाढ्यावर मुठ धरली. त्यानंतर जुलैपासून पावसाने थैमान घातल्याने दुबार पेरणीला सामोरे जावे लागले.पिके उगवल्यानंतर पाऊस उसंत घेत नसल्याने खरीप पिके पिवळी पडली तर सोयाबीनची वाढ खुंटली आहे.

दरम्यान खरीप हंगामातील पिकांची पेरणी होताच पावसाने कायम जोर धरला आहे.खरिपासाठी पाऊस हा पोषक असला तरी यंदा पिकांची उगवण होताच सतत पडत असलेला पाऊस हा पिकांना बाधित ठरत आहे. पावसाचे संकटात सोयाबीनवर गोगलगाई प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात सुर्यदर्शन दुर्मिळ झाले असल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. या दुहेरी संकटामुळे शेकतरी मेटाकुटीला आला असून किड नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात असला तरी पाऊस काही थांबांयला तयार नसल्याने आता पाऊस नको रे बाबा म्हणण्याची वेळ शेतक-यावर आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या