22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeलातूरअतनूर परिसरात जोरदार पाऊस

अतनूर परिसरात जोरदार पाऊस

एकमत ऑनलाईन

जळकोट : जळकोट तालुक्यातील अतनूर परिसरात वा-यासह विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला हा पाऊस झाला. या पावसामुळे आतनूर परिसरातील छोटे-मोठे नदी नाले ओढे भरून वाहू लागले होते, हातनूर परिसरातील तिरूनदीला जोरदार पावसामुळे पाणी आले होते . तुफान पावसामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले होते . तसेच एका शेतक-यांची माती दुस-या शेतात जाऊन थांबली होती, त्यामुळे शेतक-याचेही मोठे नुकसान झाले आहे . आतनूर परिसरात वीज पडून शेतक-याचा बैल दगावला तर तर धनगरवाडी येथील शेतक-याची म्हैस दगावली.

आतनूर व परीसरात उन्हाचा पारा वाढल्यामुळे नागरिक हैराण होते.पण सांयकाळी वातावरणात बदल होऊन वादळीवारा व मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस पडल्याने एकाची माती दुस-याच्या शेतात जाऊन नुकसान तसेच आंब्याचेही मोठे नुकसान झाले आहे. गेल्या पाच दिवसांपासून दिवसभर उन्हाचा पारा वाढल्यामुळे उष्णतेपासून नागरीक मात्र त्रस्त झाले होते पण याच काळात दरदिवशी ढगाळ वातावरण वादळी वारा सुटत होते पण हवामानाच्या अंदाजानुसार शुक्रवारी सांयकाळी मेघगर्जना व विजेचा कडकडाट व तुफान वादळी वा-यासह आतनूर ,गव्हाणचिंचोली परिसरात एक तास मुसळधार पाऊस पडल्याने छोटे मोठे नाले भरुन वाहु लागले तर यापावसामुळे एकाची माती दुस-याच्या शेतात वाहून गेल्यामुळे शेतक-याचे प्रचंड नुकसान झाले आहे.

वादळी वा-यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे पंतगा प्रमाणे हवेत उडून शिवारात पडले.आतनूर शिवारात वीज कोसळून कोंडीब विठ्ठल जाधव यांचा झाडाखाली बांधलेला एक बैल मरण पावला. जिवीत हानी झाली नसली तर संसारोपयोगी सामानाचे नुकसान झाले आहे. आंबा,भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडल्यामुळे महसूल विभागाकडून तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे, प्रकाश सोमुसे, रमेश जाधव, पत्तेवार अनिल, बंडरे, भंडारे पंडित, कल्याण पाटील, रमेश बोडेवार, अंकुश बाबर आदी शेतक-यांनी केली आहे. धनगरवाडी ता.जळकोट येथील शेतकरी दत्तू पिराजी कोरे यांची म्हेस वीज पडून दगावली. या शेतक-यांंनाही नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
सदरील ठिकाणी तलाठ्यांनी भेट देऊन पंचनामा केला.

देवणी तालुक्यात पत्रे उडाले,आंब्याचे नुकसान
देवणी तालुक्यात वादळी वा-याने अनेकांचे घरावरील पत्रे व वेअर हाऊस वरील अख्खे शेड उपटून पडले. शिवाय आंबा बागेचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवार दि.६ मे रोजी सायंकाळ च्या सुमारास घडली.

देवणी तालुक्यातील सावरगाव येथील दत्तात्र्य भुक्केवाड यांच्या आंबा बागेतील आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळी वा-याने ३५ झाडाखाली आंब्याचा सडा शिंपडल्या सारखे दिसून आले. शिवाय बागेतील ८ आंब्याची झाडे मोडून पडली आहे. बागेला कृषी अधिकारी अंकुलवार यांनी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला आहे. शासनाच्या वतीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी भुक्केवाड यांनी केली आहे. दरम्यान वादळी वा-यात देवणी येथील रसीका वेअर हाऊसचे अख्खे शेड उपटून दुस-या ठिकाणी कोसळले, यात सुदैवाने जीवीत हानी झाली नाही, मात्र वेअर हाऊसचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

चाकुरात पावसाचे पाणी घरात घुसले
येथील उजळंब कडे जाणारा मज्जीद चौक ते लक्ष्मीनगर या नव्याने तयार केलेला सिमेंट रस्ताच्या दोन्ही बाजूंच्या घरामध्ये शुक्रवारी झालेल्या पावसामुळे नालीचे घाण पाणी घुसले आहे, यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. या रस्त्याची उंची विनाकारण वाढवली आहे,त्यामुळे घराची उंची कमी झाली आहे. नाल्या कच-याने तुडुंब भरल्याने पाणी तुंबून घरांनी घुसले आहे, पावसाळा जवळ आला आहे. त्यासाठी पूर्व व्यवस्था होणे गरजेचे आहे. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. अशी मागणी या भागात राहणा-या नागरिकांनी केली आहे.

गरज पडल्यास लहान मुलांच्या आरोग्यासाठी ५00 खाटांचे नियोजन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या