21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeलातूरऔराद शहजानी परिसरात जोरदार पाऊस

औराद शहजानी परिसरात जोरदार पाऊस

एकमत ऑनलाईन

निलंगा (लक्ष्मण पाटील) : तालुक्यातील औराद शहाजानीसह परिसरात रविवारी ५६ मी मी पाऊस झाल्याने रस्त्याला तलावाचे रूप आले. महामार्गाच्या गुत्तेदाराने नालीच्या पाण्याचा निचरा व्यवस्थीत न केल्याने रस्त्यावर दूरवर पाणी साठल्याने वाहातुकीस अडथळा निर्माण झाला.अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूचे नुकसान झत्तले. तसेच दुकानांत पाणी शिरल्याने साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजाणीसह परिसरात लातूर जाहिराबाद राष्ट्रीय महामार्ग जवळपास ४ किलोमीटर पाण्याखाली असून महामार्गावर तीन ते चार फूट पाणी वाहत आहे. महामार्गाचे अर्धवट काम वाहून जाणा-या पाण्यासाठी व्यवस्थितपणे केले नसल्याने महामार्ग शेजारील जवळपास पन्नास ते साठ दुकानांत व आजूबाजूला असलेल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे अंतर्गत रस्ते पाण्याच्या प्रवाहामुळे वाहतुकीसाठी बंद आहेत.

शेतातील पिके पाण्यात तरंगत आहेत. सततच्या पावसामुळे पिके पिवळी पडली होती आता अनेक शेतक-याचे पिके मातीसह वाहुन गेली आहेत. शेतातील बांध बंधारे फुटली आहेत. जमिनीत माती वाहून जाऊन खडक उघडे पडले आहेत. शेतात ओढयाचे स्वरुप आले होते. या भागातील अनेक गावांची वाहतुक ओढ्यावरील पुलावर पाणी आल्याने अनेक तास बंद पडली होती. दुपारी ३ ते ४ या वेळेत ५६ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसानंतर तेरणा नदी दुथडी भरुन वाहात आहे. या नदी वरील औराद उच्चस्तरीय बंधारयाची दोन दारे तीन मिटरने तर तर तगरखेडा उच्चस्तरीय बंधा-याची पाच दारे तीन मिटरने उघडुन अतिरिक्त पाणी कर्नाटकमध्ये सोडुन देण्यात आले आहे

…मग ७५८ नापास का?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या