30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeलातूरऔसा तालुक्यात वादळी पावसाचे तांडव

औसा तालुक्यात वादळी पावसाचे तांडव

एकमत ऑनलाईन

औसा : दि. १४ व १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसाने औसा तालुक्यात जलप्रलय माजला असून वादळी वा-यासह झालेल्या पावसाने शेतात पाणी जावून व पिके वाहून गेल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. काढणीचे सोयाबीन पूर्णपणे वाहून गेले आहे.

सोयाबीन कापणी व मळणीचा हंगाम सुरूअसल्याने शेतक-यांनी सोयाबीनची कापणी करून रचलेल्या गंजीत पाणी शिरून वाहून गेल्याची घटना घडली आहे. तसेच सोयाबीनच्या गंजी वरील ताडपत्रे उडून गेल्याने नुकसान झाले आहे. शेतात पाणी शिरल्याने शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक शेतक-यांच्या शेतातील बांध फुटून माती वाहून गेले आहे. नदी-नाले ओसंडून वाहत असल्याने माकणी आणि तावरजा धरणात पाणी मोठ्या प्रमाणात आले आहे. तावरजा, तेरणा आणि मांजरा नदीला पूर आल्याने आजूबाजूच्या शेतातील काढून ठेवलेल्या शेतातील सोयाबीन काडाचे ढिगारे व गंजी पाण्यासोबत वाहून गेल्याच्या घटना तुंगी , कल्लिारी, रामंिलग मुदगड परिसरात घडल्या आहेत.

औसा शहराजवळील औसा ते तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाच्या बाजूच्या रोडवर पाणी तुंबल्याने वाहतूक करता येत नव्हती. परिणामी सर्व वाहनांना उड्डाणपुलावरून जाण्याची वेळ आली. तर नागरसोगा व गुबाळकडे जाणा-या वाहनचालकांची मात्र मोठी गैरसोय झाली. तालुक्यात यावर्षी अनेक वर्षानंतर प्रथमच पावसाने सरासरी ओलांडली आहे. तालुक्याची सरासरीत ७१४ मिलिमीटर असून आतापर्यंत औसा तालुक्यात ८५१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. दि. १३ आणि १४ ऑक्टोबर रोजी तालुक्यात महसूल मंडळ निहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे-औसा ७२ (९२३), भादा ५२ (७०१), किल्लारी ९६ (८४९), लामजना ४५ (९७४), मातोळा ६५ (९१४ ), किनिथोट ६२ (८७६), आणि बेलकुंड ३५ (७२३) मिमी कंसातील आकडे तालुक्यात आतापर्यंत झालेल्या महसूल मंडळातील एकूण पावसाचे आहेत. तालुक्यात सर्वात जास्त पाऊस लामजना ९७४ मिलिमीटर तर सर्वात कमी ७०१ मिलिमीटर भादा महसूल मंडळात झाला असल्याची माहिती औसा तहसील कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

https://www.youtube.com/watch?v=XafyccjkQz8&t=22sभादा नदीच्या पुलावरून पाणी आठ गावांचा संपर्कतुटला
औसा तालुक्यातील भेटा भादा परिसरात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. मंगळवारी रात्री सुरू झालेल्या परतीच्या पावसाने औसा तालुक्यातील भेटा, भादा परिसरात पिकांची हानी झाली आहे. हातातोंडाशी आलेले पिके एका रात्रीत भुईसपाट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. परतीच्या पावसाचा जोर असल्याने ऊस,ज्वारी,मका,भुईसपाट झाला तसेच सोयाबीन काढून ठेवलेल्या गंजी भिजून पाणी लागले आहे.भादा भेटा परिसरात जोरदार वादळी पावसामुळे ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

औसा तालुक्यातील ऊसाला जोरदार वा-याचा मोठा फटका बसला आहे. या भागात बहुतांशी करुन कमी पाण्याचा वापर करून ठिबक सिंचनाच्याद्वारे ऊस घेतला जातो व उन्हाळ्यात त्या ऊसाला कमी पाण्यात शेतकरी जगवतो पण वरचा देतो पण आणि नंतर घेतो सुद्धा असेही म्हटले तर वावगे ठरणार नाही. वा-याबरोबरच पाऊस असल्याने ऊस पाण्यातच पडला असल्याचे चित्र परिसरात आहे. सातत्याने पाऊस सुरु राहिल्याने ऊस कुजण्याची भिती ऊस उत्पादकांनी व्यक्त केली.

८ गावांचा संपर्क तुटला
मंगळवार रात्री ९ वाजल्यापासून सलग पाऊस सुरू झाल्याने भेटा, भादा परिसरातील लहान मोठी नदी नाले तलाव तुडुंब भरून वाहत आहेत. भादा येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे भेटा, बोरगांव, अंदोरा,वडजी, जायफळ, काळमाथा, कवठा, नाव्होली भादा येथील आनंदनगर अशा एकूण आठ गावांचा संपर्क तुटला असून पूल वाहून जाण्याची भीती परिसरातील नागरिक करीत आहेत.

सुदृढ, निरोगी आरोग्यासाठी हात धुवा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या