21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeलातूरजळकोट तालुक्यात मुसळधार पाऊस

जळकोट तालुक्यात मुसळधार पाऊस

एकमत ऑनलाईन

जळकोट : जळकोट तालुक्यात यापूर्वीच खूप पाऊस झालेला आहे यानंतर तीन ते चार दिवस पावसाने उघडीप दिली होती . या उघडीपीमुळे तालुक्यातील शेतक-यांनी पिकामध्ये अंतर मशागतीची कामे सुरू केली होती मात्र पुन्हा एकदा दि ४ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला, केवळ अर्धा तास पडलेल्या पावसामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले . जळकोट तालुक्यातील अनेक भागात पूरस्थिती नर्मिाण झाली .

जळकोट ते दापका दरम्यान असलेल्या नदीवर मोठा पूर आला होता. यामुळे शेतकरी हे एका बाजूला अडकून पडले होते. या शेतक-यांना आपल्या जनावरासह पूर ओसरेपर्यंत दुस-या बाजूलाच थांबावे लागले. या नदीपलीकडील शेतक-यांना मोठा पाऊस झाला की मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो . तालुक्यातील अनेक गावांमध्ये अशीच परिस्थिती होती. जळकोट तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये तीन ते चार दिवसाच्या वश्रिांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळला आहे . यामुळे पुन्हा एकदा पिके पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे . तसेच आंतरमशागतीची काम सुरू होती त्या कामांना देखील आता ब्रेक लागणार आहे. तालुक्यातील अतनूर परिसरातही मुसळधार पाऊस झाला .

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या