17.5 C
Latur
Saturday, November 28, 2020
Home लातूर शिरूर अनंतपाळ तालुक्यात जोरदार पाऊस

शिरूर अनंतपाळ तालुक्यात जोरदार पाऊस

एकमत ऑनलाईन

शिरुर अनंतपाळ (शकील देशमुख) : शिरूर अनंतपाळ तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने मांजरा, घरणी नदीसह नाल्याकाठच्या सोयाबीनला या पावसाचा फटका बसल्याने सोयाबीन सह खरिप पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतजमीनी ही खरडून गेल्याने शेतक-यांंचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात ९० मिमी इतका पाऊस झाला. या अतिवृष्टीने तालुक्यात ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून खरिप हंगाम धोक्यात आले आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यात सोमवारी सायंकाळी पावसाने अक्षरश: तालुक्याला झोडपून काढले. आतापर्यंतच्या पावसाळ्यात हा सर्वांत मोठा पाऊस पडला असून ९० मिमी पावसाची नोंद झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने नदी नाल्यांना पूर येवून मांजरा, घरणी नदीसह तालुक्यातील नदी नाल्याकाठच्या शेतक-याना मोठा फटका बसल्याने सोयाबीनच्या नुकसानासह शेकडो हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनी खरडून वाहून गेल्याने खरिप हंगाम धोक्यात आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

ऐन पावसाळ्यात ऑगष्ट अखेरपर्यंत पावसाने ओढ दिल्याने खरिप हंगामातील पिके कोमेजून जात असल्याने तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सप्टेंबरमध्ये प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसाने दमदार एंट्री केली. त्यामुळे नदी नाले वाहते झाले. त्यात सोमवारी सायंकाळी शहरासह तालुक्यात ढगफुटी प्रमाणे अतिवृष्टी झाली. परिणामी या अतिवृष्टीने पुर येवून मांजरा, घरणी नदीसह नाले व ओढ्याकाठचे सोयाबीनचे व शेतजमीनीचे मोठे नुकसान झाले आहे.

सिमेंट बंधारा फुटला
रहिमतुल्ला तांबोळी यांच्या शेतात असलेला सिमेंट बंधारा दोन्ही बाजूने फूटन शेतक-यांचे सोयाबीन व शेतजमीन वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. यात रहिमतुल्ला तांबोळी,हमजा मुजेवार, भागवत देवशटवार,रुकमोद्दीन मुजेवार, बालाजी हुडगे यांचे सोयाबीन व शेतजमीन वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. तर रहिमतुल्ला तांबोळी यांच्या शेतातील शेडमध्ये ठेवलेले सुमारे २५ हजार रुपयांचे खत व शेती अवजारे वाहून गेली आहेत.

पुरात वाहून जात असलेल्या तरूणाचे प्राण वाचविले
घरणी प्रकल्पाच्या क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने घरणी नदीला मोठा पुर आला. यात ज्ञानेश्वर सूर्यवंशी हे लक्कड जवळगा जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह वाहून गेल्याची माहिती त्याच गावचे युवक पोलिस ठाण्याला देताच कर्तव्यदक्ष पोलिस निरिक्षक परमेश्वर कदम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, स्थानिक युवक ंिपटू मादळे यांच्या मदतीने झाडाच्या फांदीला पकडून थांबलेल्या युवकाची सुटका केली. याकामी तहसीलदार अतुल जटाळे, सतीश सारोळे,कपिल पाटील,म्हेत्रे,तलाठी गणेश भारती व स्थानिक युवकांनी सहकार्य केले.

तळेगाव बोरी नाल्यावरील पूल गेला वाहून
या अतिवृष्टीने सोयाबीन, शेत जमीनीसह अनेक लहान पुल वाहून रस्ते खचले आहेत. यात तालुक्यातील तळेगाव बोरी नाल्यावरील पुल गेला वाहून असून यावरील वाहतूक बंद झाली, तर शिरूर अनंतपाळ च्या मुख्य रस्त्यावरील कृषी मंडळ कार्यालयाजवळील मुख्य रस्ता खचला आहे.

चाकूर तालुक्यात सोयाबीनचे पीक पाण्यात
चाकूर तालुक्यातील अनेक गावातील उभ्या सोयाबिनाच्या पिकात पाणी उभारल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागातील सोयाबिन वाहून गेले तर काही भागातील सोयाबिनच्या शेंगांचीच पुन्हा उगवण होत असल्याने, शेतकरी हैराण झाले आहेत .शासनाने शेतक-यांंना आर्थिक मदत करण्याची मागणी केली जात आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीला पुरेसा पाऊस झाला. त्यामुळे सोयाबिन पिकांच्या वाढ योग्य झाली आहे. माञ गेल्या आठवड्यात सततच्या पावसामुळे नदी ,नाले ओढे दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी उभ्या सोयाबिन पिकात पाणी साचल्याने सोयाबीनला मोठा फटाका बसला आहे.

शेंगाला फुटले मोड यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पिके चांगली बहरात आली होती. मात्र ऐन काढणीच्या अगोदरच पावसाचा जोर वाढला असल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. नगदी पीक म्हणून सर्वच शेतकरी सोयाबीन पिकाचा पर्याय निवडला आहे. सर्वत्र सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणावर होता मात्र गेल्या काही दिवसांपासून सलग पाऊस पडत असल्याने सोयाबीन पिवळे पडत आहे.सततच्या पावसामुळे घरणी ,घारोळा,वडवळ ना,मोहदळ, नांदगाव, परिसरात काढणीला आलेल्या सोयाबीनला चक्क कोंब फुटल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

ही कोणती सामाजिक सुरक्षा?

ताज्या बातम्या

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे निधन

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी रात्री पुणे येथे उपचारादरम्यान निधन. गेल्या काही वर्षांपासून आमदार भारत भालके यांना...

तिनी क्षेत्रात टीम इंडियाची खराब कामगिरी

अपयशी गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण ,सोडलेले चार झेल ,आणि फलंदाजीत ही बऱ्यापैकी कामगिरी न करणारा भारतीय संघ ६६ धावांनी पराभूत झाला या पराभवा मध्ये चांगली...

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा – अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई दि.२७ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात आज मोठया प्रमाणावर मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात...

जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचेच मतदान वैध

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार...

तिरुनदीवरील सात बॅरेजेसच्या सर्वेक्षणास तत्वत: मान्यता

जळकोट (ओमकार सोनटक्के) : तिरु नदीवर तिरु प्रकल्पाच्या निम्न बाजूस जिल्हा परिषद ,लातूर यांचे मार्फत सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जळकोट तालुक्यातील...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्गासाठी आमदार पवारांचा मध्यम मार्ग

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा या रेल्वेमार्गासाठी रेल्वे विभागाकडून सध्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्यासाठी लातूर जिल्ह्यात आलेले सुरेश जैन आणि त्यांच्या टीमने...

बांधकाम मजुरांच्या तक्रारींचा एकमत कार्यालयाकडे महापूर

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

पगार सरकारचा सेवा मात्र खाजगी रुग्णालयात

वाशी : वाशी येथील उपजिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टर पगार सरकारकडून घेतात. आणि सेवा मात्र खाजगी रुग्णालयात देवून वरकमाई जोरात करत असल्याचे पहावयास मिळत आहे....

द्वारकादासजी पाहत नाहीत कुणाची रास, कारवाई करतात बिनधास्त!

नांदेड : पोलिस विभागातील गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांची कामगिरी नेहमीच कौतुकास्पद असते. यापुर्वी त्यांना पोलिस विभागातील इनकाऊ'टर स्पेशालिस्ट म्हणून ओळख...

२६/११ चा हल्ला हा सबंध जगासाठी आव्हान होते: तांबोळी

नांदेड: मुंबईवर झालेला २६/११ चा हल्ला हा देशासमोरच नव्हे तर सबंध जगासमोर आव्हान होते. या हल्ल्याचा जगातील अनेक देशांनी अभ्यास करुन आपली सुरक्षा मजबूत...

आणखीन बातम्या

जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचेच मतदान वैध

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार...

तिरुनदीवरील सात बॅरेजेसच्या सर्वेक्षणास तत्वत: मान्यता

जळकोट (ओमकार सोनटक्के) : तिरु नदीवर तिरु प्रकल्पाच्या निम्न बाजूस जिल्हा परिषद ,लातूर यांचे मार्फत सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जळकोट तालुक्यातील...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्गासाठी आमदार पवारांचा मध्यम मार्ग

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा या रेल्वेमार्गासाठी रेल्वे विभागाकडून सध्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्यासाठी लातूर जिल्ह्यात आलेले सुरेश जैन आणि त्यांच्या टीमने...

लातूर रेल्वे बोगी प्रकल्पात फेब्रुवारीत प्रत्यक्ष उत्पादन

चाकूर : मराठवाड्याच्या विकासात महाक्रांती आणणा-या व येथील तरुणांना रोजगाराची दारे खुली करणा-या लातूर येथील मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून...

नव्या रेल्वे मार्गामुळे दक्षिण भाग जोडला जाणार

निलंगा : निजामकाळापासून (गेल्या ७२ वर्षांपासून) दक्षिण भाग रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी धूळखात पडून असलेल्या रेल्वे मार्गाला अखेर माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नांतून मंजुरी...

आ. सतीश चव्हाण यांच्या विजयाची हॅट्रिक साधून महाविकास आघाडीची एकजूट दाखवून द्यावी

लातूर : विधान परिषदेच्या मराठवाडा मतदार संघातून आमदार सतीश चव्हाण यांच्या विजयाची विक्रमी मताधिक्­याने हॅट्रिक साधावी आणि या निमिताने महाविकास आघाडीची एकजूट दाखवून द्यावी,...

बीड जिल्ह्यातील गेवराईनजीक कन्टेंनर-कारचा भीषण अपघात; वंचितच्या जिल्हाध्यक्षासह चार जण ठार

रेणापूर : (सिद्धार्थ चव्हाण) बीड जिल्ह्यातील गेवराईपासून दोन किलोमीटर अंतरावर कार व ऑईल कन्टेनरचा भीषण अपघात होऊन कारमधील पाच जणांपैकी तिघे जण जागीच ठार...

लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्गाचे अधिका-यांकडून सर्वेक्षण

औसा (संजय सगरे ) : प्रस्तावित लातूर ते गुलबर्गा या नवीन रेल्वे मार्गाबाबत सर्व्हे करण्यासाठी रेल्वेच्या अधिका-यांची टिम नुकतीच लातूर, निलंगा व उमरगा तालुक्यात...

कचऱ्यावर प्रक्रियेचा असाही लातूर पॅटर्न, निम्म्या लातूर शहराच्या ओल्या कचऱ्यापासून बनतोय खत!

लातूर : लातूर शहराला कचरामुक्त करण्यासाठी महानगरपालिका सरसावली आहे. केवळ कचरा गोळा करून कचरा डेपो येथे पाठविण्यावर न थांबता त्यावर सुनियोजित पद्धतीने पक्रिया करण्यावर...

कोरोनाविषयक निर्देशांचे पालन करा; अन्यथा दंडात्मक कारवाई

लातूर : कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. राज्यपातळीवर वाढती रुग्णसंख्या पाहता परराज्यातून येणा-या नागरिकांसाठी काही अटी व शर्ती घालण्यात आलेल्या आहेत....
1,349FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...