26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरशहर व परिसरात जोरदार पाऊस

शहर व परिसरात जोरदार पाऊस

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानूसार रविवारी मध्यरात्री लातूर व परिसरात जोरदार पाऊस झाला. सुमारे एक ते दीड तास धुवाधार पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. विजांच्या कडकडाट व ढगांच्या गडगडाटांसह जोरदार पाऊस झाला. पहाटेपर्यंत पाऊस सुरुच होता. या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवनदान मिळाले आहे.

प्रदीर्घ खंडानंतर लातूर जिल्ह्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यातील पाच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. गुुरुवारी जिल्ह्यात दिवसभर कडक उन्ह होते तर सायंकाळी ढगाळ वातावरण झाले. पावसाच्या हलक्या सरीही काही ठिकााणी पडल्या. पहाटे लातूर, हरग्ांुळ, चिंचोली ब., औसा, भादा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. या पावसाने रस्ते चकाचक झाले होते. हरंगुळ महसूल मंडळात ८३ मि. मी. पावसाची नोंद झाली तर औसा, भादा ६६, चिंचोली ब. महसूल मंडळात ६३ मि. मी. पाऊस झाला. गातेगाव महसूल मंडळात ५५ मि. मी. पावसाची नोंद आहे. दरम्यान जिल्ह्यात अन्य महसूल मंडळात पाऊस नव्हता. खरिपातील पिकांना पावसाची गरज होती आणि रविवारी मध्यरात्री जिल्ह्यातील दहाही तालुक्यांत जोरदार पाऊस झाला.

रविवारी मध्यरात्री लातूर शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. सुमारे एक ते दीड तास मुसळधार सरी कोसळल्याने शहरातील सर्वच रस्त्यांवर पाणी वाहत होते. शहरातील अंजलीनगर, संजयनगर, इस्लामपुरा, मंत्रीनगर, गांधीनगर, टागोरनगर यासह शहरातील विस्तारीत वस्त्यांमध्ये मोठ्याप्रमाणात पाणी साचले होते. काहींच्या घरातून पाणी शिरल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात विषम प्रमाणात पाऊस होता. त्यामुळे कुठे पाऊस तर कुठे पाऊस नाही, अशी परिस्थिती होती. जिल्ह्यात जवळपास पावणे सहा लाख हेक्टरवर खरीपाचा पेरा झालेला आहे. यामध्ये सव्वाचार लाख हेक्टरवर सोयाबीन आहे. मध्यंतरी पाऊस पडल्याने पिकांना दिलासा मिळाला आहेग़ेल्या १५-२० दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतक-यांना पावसाची प्रतीक्षा लागली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या