24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeलातूरलातूर शहर व परिसरात दमदार पाऊस

लातूर शहर व परिसरात दमदार पाऊस

एकमत ऑनलाईन

लातूर : भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानूसार लातूर शहर व परिसरात सोमवारी सायंकाळी दमदार पाऊस झाला. सलग दुस-याही दिवशी पावसाने हजेरी लावल्याने शेतक-यांना हा सुखद दिलासा मानला जात आहे. पावसाचा मोठा खंड पडला होता. त्यामुळे ज्यांनी पेरण्या केल्या ते दुबार पेरणीच्या संकटात तर ज्यांनी पेरण्याच केल्या नाहीत ते पेरणीच्या प्रतिक्षेत आहेत. या पावसाने आता पेरण्यांना वेग येईल, असे सांगण्यात येत आहे.

यंदा लवकर व भरपूर पाऊस असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळे शेतक-यांनी एप्रिल-मे चे कडक ऊन अंगावर घेत शेत-शिवार खरीपाच्या पेरणीसाठी तयार करुन ठेवले. वर्तविलेल्या अंदाजानूसार यंदाच्या मृृग नक्षत्रात मान्सूनच्या पावसाचे वेळेवर आगमन झाले. दोन-तीन मध्यम स्वरुपाचे पाऊस पडल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. याच पावसावर काही शेतक-यांनी पेरण्या केल्या मात्र पेरलेले उगवले नाही तोवर पावसाने उघडीप दिली. पावसाचा मोठा खंड पडला. त्यामुळे पेरणी केलेल्या शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट आले.

तर ज्यांनी पेरणी केली नाही ते पेरणीच्या प्रतिक्षेत आहेत. मृग नक्षत्राने घोर निराशा केल्यानंतर आर्द्रा नक्षत्रावर सर्वाच्या अपेक्षा आहेत. त्यातच हवामान खात्याच्या वेगवेगळ्या अंदाजाने शेतकरी धास्तावले आहेत. मात्र सोमवारी, मंगळवारी विदर्भ, मराठवाड््यासह लातूर जिल्ह्यात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आणि त्यानूसार रविवारी व सोमवारी पावसाने हजेरी लावली. सोमवारचा पाऊस दमदार होता. लातूर आणि आसपासच्या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत अनेक भागांत पावसाचा जोर कायम होता. लातूर जिल्ह्यात मृग नक्षत्रात पडलेला पाऊस असमान होता. कुठे पडला तर कुठे नाही, कुठे रिमझीम तर कुठे मध्यम, कुठे मध्यम तर कुठे जोरदार असा पाऊस पडत गेला. त्यामुळे जिल्ह्यातील काही महसूल मंडळात ब-यापैकी तर काही महसुल मंडळात अत्यल्प पाऊसाची नोंद झाली. त्याचा फटका शेतक-यांना बसला. काही ठिकाणी पेरण्या झाल्या तर काही ठिकाणी पेरण्या झाल्याच नाहीत. जिल्ह्यातील ६ लाख १२ हजार ४२१ हेक्टर खरीप क्षेत्रापैकी केवळ ६१.९३ टक्के पेरण्या झालेल्या आहेत.

विजा व मेघ गर्जनांसह पाऊस
विदर्भ, मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानूसार सोमवारी लातूर शहरासह परिसरात पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला रिमझिम असलेला पाऊस पाहता पाहता जोरदारपणे सुरु झाला. मेघ गर्जनेसह सायंकाळी ४.४५ वाजता पावसाला सुरुवात झाली. मेघ गर्जनेसह पडलेला सोमवारचा दमदार पाऊस या मोसमातील पहिला पाऊस आहे. वीजांचा लखलाखट आणि मेघ गर्जना करीत पावसाने पुनरागमन करुन शेतक-यांना एक प्रकारे सुखद दिलासाच दिला आहे.

अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले
यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात दमदार पाऊस सोमवारी सायंकाळी पडला. लातूर शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसाने शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले होते. गटारी भरुन वाहत होत्या. अनेंक ठिकाणी गटारी तुंबून गटारीचे पाणी रस्त्यावर आले होते. शहरातील अंजलीनगर, इस्लामपूरा, राजीव गांधीनगरचा काही भाग, गाव भागातील सखल भागात पाणी साचले होते. अनेकांच्या घरातून पाणी शिरले.

पंढरपुरात आषाढी वारीत 17 ते 25 जुलैपर्यंत संचारबंदी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या