24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeलातूरलातूर शहर व परिसरात पावसाची दमदार हजेरी

लातूर शहर व परिसरात पावसाची दमदार हजेरी

एकमत ऑनलाईन

लातूर : पुढील पाच दिवसांमध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यानूसार शनिवारी दुपारी लातूर शहर व परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. मान्सून सुरु झाल्यापासुन आतापर्यंच्या पावसात शनिवारचा पाऊस मोठा होता.

दरवर्षीपेक्षा यंदा पाऊस वेळेवर व चांगला पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केल्यामुळे शेतक-यांनी एप्रिल-मे चे प्रखर उन्ह अंगावर घेत शेतीतील मशागतीची कामे उरकुन घेतली. खरिपाच्या पेरणीची पुर्ण तयारी शेतक-यांनी करुन ठेवली आहे. ८० ते १०० मी. मी. पाऊस पडल्याशिवाय शेतक-यांनी पेरणी करु नये, असे आवाहन कृषी विभागाने केलेले असले तरी जिल्ह्यात काही ठिकाणी पेरणीस सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक असून त्याखालोखाल तूरीचे क्षेत्र आहे. लातूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असल्यामुळे येत्या काही दिवसांत शेतकरी पेरण्या उरकुन घेतील, अशी परिस्थती आहे.

शनिवारी दुपारी आकाशात ढगांची गर्दी जमली. पाहता पाहता वादळी वारा सुटला आणि मोठा पाऊस पडला. २० ते २५ मिनीटे पाऊस पडला. त्यानंतर दोन तासांनी पुन्हा आभाळ भरुन आले आणि ढगांच्या गटगडाटासह पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील लातूर, औसा, रेणापूुर, निलंगा, चाकुर, अहमदपूर आदी तालुक्यांत ब-यापैकी पाऊस झाला.

गटारींचे पाणी रस्त्यावर
या पावसाने लातूर शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. सम्राट चौकातील हॉटेल अंकुरच्या समोरील वीजेच्या तारांवर झाडांची फांदी तुटून पडली. त्यामुळे मोठा आवाज होऊन ठिणग्या पडल्या आणि वीजेच्या तारा तुटल्या. काही वेळाने वीज प्रवाह बंद करण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान जुना गुळ मार्केट चौकातील सोमाणी सायकल्या कोप-यावरील गटार तुंबुन घाण पाणी आणि कचरा रस्त्याने वाहत होता. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला.

जि.प. शाळेत अज्ञात गावगुंडांचा धुडगूस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या