22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeलातूरलातूर शहर परिसरात पावसाची दमदार हजेरी

लातूर शहर परिसरात पावसाची दमदार हजेरी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर व परिसरात आता पावसाळी वातावरण तयार झाले आहे. जूनच्या तीस-या आठवड्यापर्यंत पाऊसच नव्हता. आता मात्र गेल्या तीन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस हजेरी लावत आहे. दि. २२ जून रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्या सूमारास पावसाला सुरुवात झाली आणि सुमारे अर्धा तास दमदार पाऊस पडला. या पावसामुळे शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

लातूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. पाऊस पडत असला तरी अद्याप जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात झालेली नाही. शेतक-यांनी पेरणीची घाई करुन नये, पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरण्यास सुरुवात करुन नये, किमान ७५ मिलीमीटर पाऊस झाल्यासच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी अद्यापही पेरणीच्य प्रतिक्षेत आहेत. गत वर्षी लातूर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला त्यामुळे संपूर्ण उन्हाळ्यातही बहुतांश प्रकल्पांतील पाणीसाठा जीवंतच राहिला. परिणामी जिल्हा टँकरमुक्त राहिला. यंदाही ब-यापैकी पाऊस असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविलेला आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शेतक-यांनी खरीपासाठी रान तयार करुन ठेवली आहेत. पेरणीसाठीची सर्व तयारी आहे. पेरणीयोग्य पाऊस होताच पेरण्यांची घाईगडबड सुरु होणार आहे, असे सध्याचे चित्र आहे.

बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत लातूर जिल्ह्यात ५.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. लातूर तालुक्यात ७.४ मिमी, औसा-०२, अहमदपूर-०५, निलंगा-१०.२, उदगीर-१.१, चाकुर-१.७, रेणापूर-९.६, देवणी-२.९, शिरुर अनंतपाळ-२३.२ तर जळकोट तालुक्यात पाऊस निरंक आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या