21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeलातूरलातूरच्या पुर्वभागात जोरदार पाऊस

लातूरच्या पुर्वभागात जोरदार पाऊस

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहराच्या पुर्वेकडील ग्रामीण भगाात रविवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेत-शिवारांनी पाण्याचे तळे साचले आहे. सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत. बाभळगाव, धनेगाव, बोरी, सावरगाव, ममदारपूर, सलगरा खुर्द आदी गावांत जोरदार पाऊस झाल्याने या गावातील शेतीचे मोठे नूकसान झाले आहे.

हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा आधीच दाखल होऊन सुखद धक्का देणारा मोसमी पाऊस आगमनाच्या जोरदार हजेरीनंतर गायब झाला होता. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले होते. मोसमी पावस जितका पडला त्यावरच बहुतांश शेतक-यांनी खरीपाच्या पेरण्या उरकल्या होत्या. पाऊस पडेल, अशी अपेक्षा होत परंतू, पावसाने ओढ दिली आणि मोड फुटलेली पिके जळू लागली, वाढलेल्या पिकांनी माना टाकल्या. पावसाअभावी पेरणी वाया जाण्याची भिती व्यक्त केली जाऊ लागली. मृग नक्षत्राने हवी ती साथ दिली नाही. त्यामुळे सर्व नजरा आर्द्रावर होत्या. या नक्षत्रात पुन्हा पावसाळी वातावरण निर्माण झाले आणि पावसाला सुरुवात झाली.

या नक्षत्रात ब-यापैकी पाऊस पडल्याने शेतक-यांवरी दुबार पेरणीचे घोंगावणारे ढग निघून गेले. कधी रिमझिम, कधी हलका, कधी मध्यम तर कधी जोरदार पाऊस पडत गेल्याने पिके तरारुन आली आहेत. लातूर शहर व जिल्ह्यात काही ठिकाणी शनिवारी दुपारनंतर मोठ्या पावसाने हजेरी लावली. लातूर शहरात सायंकाळी दमदार पाऊस झाला. जवळपास अर्धा तासापेक्षा जास्त वेळ पाऊस पडल्याने शहरातील सर्व रस्ते जलमय झाले होते.

रविवारीही सायंकाळी पावसाचे आगमन झाले. काही काळ विश्रांती घेतलेला पाऊस आता टप्प्याटप्प्याने पडत आहे. लातूर जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्या बहुतांश उरकल्या आहेत. पहिल्या पावसावर ज्यांनी पेरण्या केल्या त्यांची पिके सध्या जोमात आहेत. तर काहींनी महिन्याभरानंतर चाड्यावर मुठ धरली आहे.

जिल्ह्यात सोयाबीनची सर्वाधिक पेरणी
जिल्ह्यात खरिपाचे ६ लाख १२ हजार ३२१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्ह्यात ३ लाख ९२ हजार ३०९ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. त्याखालोखाल तूर, मूग, उडीद, साळ, ज्वारी, बाजरी, मका, भूईमुग, तीळ, लहान कारळे, सूुर्यफूल, कापसाची पेरणी झाली आहे.

ढगांचा गडगडाट, वीजांचा कडकडाट
लातूर शहर व परिसरात शनिवारी दुपारी मोठा पाऊस पडला होता. त्याचीच पुर्नरावृत्ती रविवारी पावसाने केली. रविवारीही सायंकाळी लातूर शहर व परिसरात पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता जोरदार पाऊस झाला. पावसासह ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट झाल्या. सलग दोन दिवस मोठा पाऊस पडल्याने शेतक-यांमध्ये समाधान असले तरी जिल्ह्यातील जलस्त्रोतांतील जलसाठा वाढण्यासाठी अद्यापही मोठ्या आणि सलग पावसाची गरज आहे.

विनातिकीट प्रवाशांवर रेल्वे विभागाची कारवाई

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या