25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूरअतिवृष्टी: १३ मंडळांत होणार पिकांचे पंचनामे

अतिवृष्टी: १३ मंडळांत होणार पिकांचे पंचनामे

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
गेल्या आठवड्यात जिल्ह्यात काही महसुल मंंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिके पाण्यात गेली. शेतक-यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी अतिवृष्टी झालेल्या मंडळांमध्ये पिकांचे व शेतजमिनीच्या नूकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला दिल्याची माहिती महसूल विभागातून देण्यात आली आहे.

कधी नव्हे यंदा शंखी गोगलगायींनी खरीप पिकांवर हल्ला चढविला आहे. गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. खरीप पिकांवर शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. या संकटामुळे शेतकरी चिंतेत आहेत. कृषी विभागाकडून शेतक-यांना त्यावरील उपाययोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. अधीच चिंतेत असलेल्या शेतक-यांना गेल्या आठवड्यात ८ जुलैपासून संततधार व अतिवृष्टीला सामोरे जावे लागले. त्यामुळे अनेक भागांतील खरिपाची कोवळी पिके पाण्यात गेली. शेतक-यांचे खुप मोठे नूकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतक-यांमधून होत होती. त्यानुसार जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दि. १९ जुलै रोजी आदेश काढून अतिवृष्टीने नूकसान झालेल्या पिकांचे व शेतजमिनीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिले आहेत.

महसूल व वन विभाग शासन निर्णय दि. १३ मे २०१५ मधील निकषव दर विचारात घेऊन बाधित शेतक-यांना मदत करण्यासाठी आवश्यक निधी मागणीचा प्रस्ताव दि. २१ जुलैपर्यंत सादर करण्यातबाबत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आदेशीत केले आहे. जिल्ह्यातील ज्या मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, अशा मंडळातील शेतीपिकांचे व शेतजमिनीचे नूकसान झाले असल्यास अशा नूकसानीचे ग्रामस्तरीय समिती (तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक) यांच्यामार्फत संयुक्त पंचनामे तातडीने पुर्ण करावेत, असे आदेशात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी नमुद केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या