22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरअतिवृष्टी, गोगलगाय आणि आता 'यलो मोझॅक’

अतिवृष्टी, गोगलगाय आणि आता ‘यलो मोझॅक’

एकमत ऑनलाईन

कोतल शिवणी : महेश शेळके
निलंगा तालुक्यातील कोतल शिवणीसह, तुपडी, वडगाव, आंबेगाव, शेडोळ,हाडगा, आनंदवाडी या गावांमध्ये पिवळा-‘यलो मोझॅक’ या रोगामुळे शेतक-यांना शेतातील उभे सोयाबीन पीक नष्ट करण्याची वेळ आली. कोतल शिवणी परिसरात (दि.३ ऑगस्ट) रोजी ढग फुटीसदृश पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यातूनही राहिलेले पीक त्यावरही ‘यलो मोझॅक’ या रोगामुळे शेतक-यांना सोयाबीन उपटून शेताबाहेर काढण्याची वेळ आली आहे.

पिवळा मोझॅक हा रोग विषाणूजन्य रोग असून याचा प्रसार पांढरी माशी या किडीद्वारे होतो. रोगट झाडांच्या पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. कोतल शिवणी येथील राजाराम भिमराव गुरणे या शेतक-यांनी त्याच्या शेतात दिड एकर वरील सोयाबीन शेतातून मुळासकट उपटून बाधावर टाकले आहे. तुपडी येथील पृथ्वीराज गोरे या शेतक-यांनी त्यांच्या चार एकरवरील उभ्या सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरविण्याची वेळ आली.

कोतल शिवणी येथील जवळपास शंभर हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र पिवळा ‘यलो मोझ्याक’ मुळे सोयाबीन पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, शिवणी येथील शेतकरी आदीनाथ औरादे, मोहन औरादे, विठ्ठल औरादे, अक्षय औरादे, गहिनीनाथ औरादे, सुभाष रासे, बालाजी भोजणे, बालाजी आयतनबोने, भिमा कोरे, सोम रासे, तिरूपती कारवडे, वसंत औरादे, व्यंकट शिंदे, पांडुरंग शिदे, विकास शिंदे, दयानंद शेळके, श्रीहरी कोरे,दस्तीगिर शेख, प्रल्हाद औरादे, पंडित भोजणे, रामराव शेळके, गहिनीनाथ शिंदे, बाबू शिंदे, व्यंकट वाघमारे, ओम कोरे, विनायक भोजणे, प्रल्हाद शेळके आदी शेतकरी येत्या चार-पाच दिवसांत पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याच्या तयारीत आहेत. या प्रकरणी तातडीने मदत मिळत नसल्यान दस्तगीर शेख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या