28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरगोगलगायीमुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना मदत

गोगलगायीमुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना मदत

एकमत ऑनलाईन

औसा : गोगलगायीच्या प्रादुर्भावाने सोयाबीनसह खरिप हंगामातील पिकांच्या नुकसानी संदर्भात विधिमंडळ अधिवेशनात चर्चा घडवून आणली त्यानंतर लक्षवेधी मांडल्यानंतर राज्याच्या कृषीमंत्र्यांनी औसा तालुक्याचा दौरा केला. या दौ-यात पाहाणी केल्यानंतर कृषीमंर्त्यानी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटून तात्काळ मदतीची आश्वासन दिले. मात्र यानंतर पुढील प्रक्रिया होत नसल्याने पुन्हा उपमुख्यमंत्र्यांना भेटून बोंडअळीच्या धर्तीवर गोगलगाय प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतक-याना मदत मिळावी व शासनाने तो शासकीय आदेश लवकर काढून मदत देण्याची मागणी केली. यानंतर बुधवारी मुख्यमंत्र्यांनी शासकीय आदेश काढत निधीही उपलब्ध करून दिला आहे.

गोगलगाय प्रादुर्भावाने लातूर जिल्ह्यातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले होते गोगलगाय प्रादुर्भावाने नुकसान झाल्यानंतर त्यासाठी मदतीची तरतूद एनडीआरएफ व एसडिआरफ मध्ये नसल्याने या शेतक-यांंना बोंडअळीच्या धर्तीवर गोगलगाय प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतक-याना मदत देण्याची मागणी विधीमंडळ अधिवेशनात केली. तसेच एका व्हिडिओ चित्रीकरणच्या माध्यमातून गोगलगाय कशा प्रकारे पिकांना फस्त करते याचे वास्तव्य त्यांनी समोर आणत या संदर्भात लक्षवेधी मांडल्यानंतर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी औसा तालुक्याचा दौरा केला. या पाहाणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून तात्काळ मदतीची आश्वासन दिले होते. मात्र पुन्हा याप्रकरणी पुढील प्रक्रिया होत नसल्याने दि. ९ सप्टेंबर रोजी आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन या संदर्भात शासकीय आदेश लवकर काढण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली होती.

यानंतर दि.१४ सप्टेंबर रोजी यासंदर्भात गोगलगाय प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी मदतीचे शासकीय आदेश काढण्यात आले आहेत. यानुसार लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील १ लाख ६ हजार १२ शेतक-यांंना ही मदत मिळणार आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील ६८ हजार २९५ हेक्टर बाधीत क्षेत्रासाठी ९२ हजार ६५२ शेतक-यांना ९३ कोटी ३६ हजार ऐवढी मदत मिळणार आहे. लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील ७२ हजार ५०० हेक्टर क्षेत्र गोगलगाय प्रादुर्भावाने बाधीत झाले होते. एनडिआरएफ च्या पहिल्याच्या निकषांनुसार ही मदत दुप्पट असून दोन हेक्टरची मर्यादा वाढवून ही मदत तीन हेक्टर पर्यंत मिळणार आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे शेतक-यांना ही मदत मिळाली असून मदतीचा शासकीय आदेश काढून यासंदर्भातील निधीची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच शेतक-यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या