लातूर : विलास सहकारी साखर कारखान्याच्या तोंडार येथील युनिट क्रमांक २ कडून शेतकऱ्यांच्या ऊसाला आजपर्यंतचा सर्वाधिक प्रति टन २७८२ रुपये एवढा विक्रमी भाव दिला आहे. त्याबद्दल राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांचे आज शुक्रवार दि. २९ जुलै रोजी लातूर शहर शहर कार्यालय येथे जळकोट तालुक्यातील विविध गावचे शेतकरी, सरपंच, विकास सोसायटीचे चेअरमन, सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी स्वागत करून आभार मानले.
लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा, कष्टकरी जनतेच्या जीवनात परिवर्तन घडावे या विचाराने माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांनी मांजरा परिवाराच्या माध्यमातून अनेक साखर कारखान्यांची उभारणी केली आहे. त्या विचाराची जपणूक करण्यासाठीच विलास कारखान्याने उदगीर येथील हा कारखाना चालवण्यास घेतला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी या कारखान्याकडून प्रयत्न केले जात आहेत.
आगामी काळात ही शेतकऱ्यांच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठीचे प्रयत्न सुरूच राहतील अशी ग्वाही याप्रसंगी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख दिली. यावेळी जळकोट तालुक्यातील सुलाळी, तिरुका, घोणसी, उती, डोंगर कोणाळी, मंगरूळ, रावणकोळा, माळी हिप्परगा, डोंगरगाव, कुणकी, विराल, करंजी, सोनवळा, हावरगा, हरदवणवडा, येलदरा आदी गावचे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, नूतन पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी यांनी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी उसाला सर्वाधिक भाव दिल्याबद्दल सत्कार करून त्यांचे आभार मानले.
यावेळी लातूर लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी महापौर दीपक सूळ, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समद पटेल, जळकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मारुती पांडे, मनमतआप्पा किडे, संतोष तिडके, राजेश मोतेवाड, बाबुराव जाधव, बालाजी ताकभिडे, बालाजी पवार, रविशंकर जाधव, युनूस मोमीन, प्रवीण सूर्यवंशी, शरद देशमुख, अमरजीत पाटील, किरण ढोबळे, मधुकर डावळे, परमेश्वर चव्हाण, दिगंबर गव्हाणे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, ऊस उत्पादक शेतकरी, जळकोट काँग्रेसचे पदाधिकारी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.