28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरहिंदी भाषा ही पूर्वजांनी दिलेली बहुमोल देण - प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी

हिंदी भाषा ही पूर्वजांनी दिलेली बहुमोल देण – प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
हिंदी भाषा ही गौरवशाली अशी भाषा असून या देशातील जनजन की हिंदी हर दिल की धडकन है या भाषेच्या बळावरच आपण अनेक आव्हाने पेलू शकतो. हिंदी भाषेमुळे आपली सभ्यता आणि संस्कृतीची ओळख होते. आपल्या भावनेला विचाराला प्रकट करण्यासाठी प्रभावी असलेली हिंदी भाषा ही आपली अभिव्यक्तीची भाषा होय. आपल्या पूर्वजांनी दिलेली भाषा ही बहुमोल अशी देण आहे. या भाषेचे संगोपन व संवर्धन आपण सर्वांनी करावे, असे विचार प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

येथील श्रीमती सुशीलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालयात ‘हिंदी भाषा दिवस’ साजरा करण्यात आला. या समारंभाचे अध्यक्ष प्रा. दादासाहेब लोंढे हे होते. विचार मंचावर प्रा. डॉ. सविता किर्ते, प्रा. डॉ.कुमार बनसोडे, प्रा. जयंत शास्त्री, गुणवत्ता हमी कक्षाच्या प्रमुख प्रा. अनिता गायकवाड व विद्यार्थी प्रतिनिधी, मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. संतोष कुलकर्णी म्हणाले की, भाषा ही आपली सर्वांची एक जीवन पद्धती असून आजच्या बदलत असलेल्या समाजाबरोबर आपली जीवनमूल्य व संस्कृतीला आत्मसात करुन विकसित झालेली हिंदी भाषा ही संपन्न समृद्ध अशी असून, पाश्चात्य संस्कृतीमुळे व जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या अनेक आव्हानाला प्रेरणाची सामर्थ्य हिंदी भाषेत आहे. ते कसे याविषयी मौलिक असे मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक हिंदी विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. सविता कीर्ते यांनी केले. प्रा. जयंत शास्त्री यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी शेख सानिया महेक सय्यद, श्रद्धा कांबळे, प्रतीक्षा जाधव यांनी आपले विचार मांडले. अध्यक्षीय समारोप प्रा. दादासाहेब लोंढे यांनी केले. आभार आशिष जाधव यांनी व्यक्त केले. या समारंभास प्रा. डॉ. शंकरानंद येडले, प्रा. डॉ. पांडुरंग शितोळे, प्रा. डॉ. बाळू कांबळे, प्रा. शिवाजी मोहाळे, प्रा. डॉ. बनसोडे बादल, प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या