24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeलातूरशिरूर अनंतपाळ तालुक्यात हिसामाबाद जि.प.गट वाढले

शिरूर अनंतपाळ तालुक्यात हिसामाबाद जि.प.गट वाढले

एकमत ऑनलाईन

शरुर अनंतपाळ : शकील देशमुख
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या हालचाली सुरू केली आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रारूप प्रभाग रचना २ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून यात शिरूर अनंतपाळ तालुक्यात एक गट व दोन गण वाढले असल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या असून प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्याने तालुक्यात राजकीय चर्चांना वेग आला असून आतापासूनच राजकीय आडाखे बांधत असल्याचे चत्रि दिसत आहे.

लातूर जिल्हा परिषदेचे गट व गण वाढणार असल्याने शिरूर अनंतपाळ तालुक्यात सध्या दोन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समितीचे गण असून या निवडणुकीत एक गट व दोन गण वाढणार का यांकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले होते.अखेर गुरुवारी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली असून एक गट व दोन गण वाढले असल्याने राजकीय लोकासह नागरिकांतून आनंद व्यक्त केला जात आहे. दरम्यान शिरूर अनंतपाळ तालुका निर्मितीनंतर तालुक्यात तीन जिल्हा परिषद गट व सहा पंचायत समितीचे गण होते.मात्र शिरूर अनंतपाळ नगरपंचायत अस्तीत्वात आल्यानंतर एक गट व दोन गण कमी होवून साकोळ व येरोळ जि.प. गट तर साकोळ,हिसामाबाद,येरोळ व हिप्पळगाव असे चार पं.समितीचे गण शिल्लक राहिले होते. यात साकोळ, येरोळ कायम राहून हिसामाबाद जिल्हा परिषद गट नव्याने निर्मिण झाल्याने आता तीन गट तर साकोळ, राणी अंकुलगा,येरोळ, हिप्पळगाव, हिसामाबाद व हालकी असे पं.स. चे सहा गण निर्माण झाले असून आता निवडणुका केंव्हा जाहीर होणार यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यात येरोळ जि.प.गटात हिप्पळगाव गणात हिप्पळगाव, धामणगाव, शिवपूर, रापका, बोळेगाव, आनंदवाडी, तुरुकवाडी, लक्कडजवळगा या आठ गावांचा तर येरोळ गणात येरोळ, नागेवाडी,डिगोळ,सुमठाणा, कारेवाडी, चांबरगा,जोगाळा,हणमंतवाडी या आठ गावांचा समावेश आहे. हिसामाबाद गटात हालकी गणात हालकी, थेरगाव, वांजरखेडा ,तळेगाव बोरी, उमरदरा, कांबळगा, गणेशवाडी या सात तर हिसामाबाद गणात हिसामाबाद,कळमगाव,सय्यद अंकुलगा, बेवनाळ, भिंगोली, डोंगरगाव बोरी,आरी या सात गावांचा समावेश आहे.

साकोळ गटात साकोळ गणात साकोळ,शेंद द.,कानेगाव,तिपराळ या चार गावांचा तर राणी अंकुलगा गणात राणी अंकुलगा, सांगवी घुगी,बाकली, बिबराळ, अजनी बु.,होनमाळ,तळेगाव दे.,दैठणा या आठ गावांचा समावेश आहे. शिरुर अनंतपाळ पंचायत समिती क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात असून ज्या लोकांच्या काही हरकती असतील त्यांनी त्या हरकती सकारण जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे दि. ८ जुन पर्यंत लेखी सादर कराव्यात.तारखेनंतर आलेल्या हरकती जिल्हाधिकारी विचारात घेणार नाहीत असे ही प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या