28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरकाशीपीठाच्या जगद्गुरुंचा ऐतिहासिक गौरव सोहळा

काशीपीठाच्या जगद्गुरुंचा ऐतिहासिक गौरव सोहळा

एकमत ऑनलाईन

  • लातूर : प्रतिनिधी
    काशीपीठाच्या दोन जगद्गुरुंच्या सानिध्यात रविवारी भव्य ऐतिहासिक गौरव सोहळा पार पडला. नूतन जगद्गुरुंचे यावेळी आशिर्वचन झाले. या सोहळ्यास भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने रविवारी दिवाणजी मंगल कार्यालयात काशी पीठाचे नूतन जगद्गुुरु श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी व जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी डॉ. शांतीवीरलिंग शिवाचार्य महाराज होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून अनेक शिवाचार्य महाराजांची उपस्थिती होती. लातूरकरांनी अतिशय भक्तीभावाने आयोजित केलेला हा सोहळा ऐतिहासिक झाला. काशी पीठाकडून यापुढील काळात या भागातील होतकरु विद्यार्थ्यांना जी मदत करता येईल, ती करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे आश्वासन जगद्रुंनी दिला.

    मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा
    शिक्षणाला अध्यात्माची जोड हवी, असे सांगत या सोहळ्यात शारीरिक चिकित्सा आणि मानसिक चिकित्सा असा योग पहायला मिळाला असे मत जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी व्यक्त केले. या सोहळ्यानिमित्त साई फाउंडेशनच्या वतीने डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराला रुग्णांची गर्दी पडली होती. शेकडो रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात अनेक डॉक्टरांमार्फत विविध तपासण्या करण्यात आल्या. प्रारंभी नूतन जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन महास्वामीजी यांच्या हस्ते फीत कापून शिबिराचे उद्घाटन झाले. अध्यक्षीय समारोप डॉ. शांतीवीरलिंग शिवाचार्य महाराज यांनी केले.

    प्रास्ताविक प्रा. मन्मथप्पा पंचाक्षरी, सूत्रसंचालन शिवकांत स्वामी व प्रा. ओमप्रकाश झुरुळे यांनी केले. आभार बसवंतअप्पा भरडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अ‍ॅड. गंगाधर हामणे, प्रा. भालचंद्र येडवे, विश्वनाथ निगुडगे, भालचंद्र मानकरी, उमाकांत कोरे, प्रकाश दुलंगे, सुभाष मुक्ता, सुरेश दोशेट्टी, ओमकार पंचाक्षरी, बालाजी पिंपळे, दीपक वांगसकर, बाबुराव वडगावे, पुष्पराज खुब्बा, अ‍ॅड. उमाशंकर पाटील, रामलिंग ठेसे, सतीश खेकडे, लक्ष्मीकांत मंठाळे, शरणाप्पा अंबुलगे, रामदास भोसले, वीरभद्र स्वामी आदींनी परिश्रम घेतले. या सोहळ्यास भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या