मेहकर: कर्नाटकातील बेडा जंगम समाजांच्या वतीने ३० जून रोजी बेंगळूरु येथील फ्रीडम पार्क येथे आयोजित अखिल भारतीय कर्नाटक बेडा जंगम समाज अध्यक्ष बी डी. हिरेमठ व कर्नाटक मठाधीश यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजकल्याण मंत्री श्रीनिवास पुजारी आंदोलन स्थळी भेट देऊन बेडा जंगम प्रमाणपत्र कायद्याचा अभ्यास करून देण्याचे जिल्हाधिका-यास आदेश देण्याचे आश्वासन दिले.
पाच दिवस उलटून गेले तरीही आदेश आला नाही. त्यासाठीच बेडा जंगम समाजांच वतीने कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यासाठी गेलेल्या समाज बांधवाना बेंगळूरू पोलीसानी अटक केले. यामुळेच कर्नाटकातील प्रत्येक जिल्हा व तालुका तहसील कार्यलयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. धरणे आंदोलन बेडा जंगम प्रमाण पत्र आदेश येईपर्यंत करण्यात येणार आहे. भालकी तालुका बेडा समाजांच्या वतीने भालकी तहसीलदार र्किती चालक यांच्यावतीने भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, कर्नाटक राज्यपालांना निवेदन देण्यात आले. उच्च न्यायालयाचा आदेश असूनही सरकार बेडा जंगम प्रमाण पत्र देत नाही.