30.6 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home लातूर लातूर जिल्ह्यात वीज बिलाची होळी

लातूर जिल्ह्यात वीज बिलाची होळी

एकमत ऑनलाईन

रेणापूर : भरमसाठ वीजबिलाबाबत नागरिकांना रास्त सवलत द्यावी या मागणीसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपाचे रेणापूर तालुकाध्यक्ष अ‍ॅड दशरथ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.२३) रेणापूर येथील विज वितरण कार्यालया समोर वीजबिलाची होळी करून आंदोलन करण्यात आले. देवणी येथे भाजपाचे तालुकाध्यक्ष काशिनाथ गरिबे यांच्या तर निलंगा येथे भाजपाचे तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. शिरुर अनंतपाळ येथे भाजपाचे तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. अहमदपूर येथे भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.

लॉकडाऊनच्या काळात राज्यातील जनतेला भरमसाठ वीजबिले देऊन आघाडी सरकारने मोठ्या विजबिलाचा शॉक दिला. याबाबत जनआक्रोश निर्माण झाल्यावर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी सवलत देण्याचे जाहीर केले होते. दरम्यान बिलाबाबत सवलत देता येणार नाही, नागरिकांना बिले भरावी लागतील असे स्वत: ऊर्जामंर्त्यांनी स्पष्ट सांगितल्याने महावितरण कंपनीच्या कर्मचा-यां कड्रन सक्तीने वीजबिले वसूल करण्यात येत आहेत . तेंव्हा भरमसाठ वीजबिलाबाबत जनतेला रास्त सवलत द्यावी या मागणीसाठी सोमवारी (दि. २३) येथील विज वितरण कार्यालयासमोर वीज बिलाची होळी आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश आंबेकर, जि.प.सदस्य सुरेंद्र गोडभरले, पंचायत समिती सभापती रमेश सोणवणे , रेणापूरच्या नगराध्यक्षा आरती राठोड, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष कुलभूषण संपते, महिला मोर्चा अध्यक्षा अनुसया फड, रेणापूर शहराध्यक्ष दत्ता सरवदे, अजीम शेख, अंतराम चव्हाण, धनंजय म्हेत्रे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस नरंिसग येलगटे, किसान आघाडीचे अध्यक्ष शिवमूर्ती उरगुंडे, सरचिटणीस वीरेंद्रसिंग चौहान, मारुती गालफाडे, संजय चव्हाण योगेश पनगुले, महेश गाडे, ज्ञानेश्वर पांचाळ, वैजनाथ कनामे, बबलू गडगिळे, राहुल केंद्रे, राम बरीदे, बंडू केंद्रे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

देवणी देवणी येथील बोरोळ चौकात भारतीय जनता पार्टीच्या वतीने वीज बिल होळी आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष काशिनाथ गरिबे, ज्येष्ठ नेते हावगीराव पाटील, बसवराज पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी बिरादार, पंचायत समितीचे उपसभापती शंकर पाटील तळेगावकर, नगराध्यक्ष वैजिनाथ अष्टूरे, भाजयुमो तालुकाध्यक्ष रामंिलग शरे, शहराध्यक्ष अटल धनुरे, महेश सज्जनशेट्टे, नगरसेवक बाबुराव इंगोले, सोमनाथ बोरोळे, ईश्वर पाटील, अमर पाटील, संगम पताळे, मच्छींद्र नरवटे, ओम पाटील, बालाजी सुर्यवंशी, यांच्यासह तालुक्यातील बहुतांश भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

निलंगा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने वीज बीलाची होळी आंदोलन करण्यात आले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मंत्र्यांची वीज बीले माफ व जनतेला मात्र अव्वाच्या सव्वा वीज बील आकारणी केली आहे. त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे यांच्या नेतृत्वाखाली वीज बिलाची होळी करुन निषेध आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन एम एस ई बी ऑफिससमोर करण्यात आले.

यावेळी युवा मोर्चा जिल्हा संघटन प्रमुख तानाजी बिरादार, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बाळासहेब पाटील उपनगराध्यक्ष मनोज कोले, नगरसेवक किरण बाहेती, भुरके, इरफान सय्यद, महादेव फटे, विष्णू ढेरे, नामदेव काळे, तम्मा माडीबोने, संजय हलगरकर, युवराज पवार, नागेश पाटील, तानाजी सकोळे, अशोक वाडीकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

शिरूर अनंतपाळ येथे भारतीय जनता पार्टी शिरूर अनंतपाळ तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील बसवेश्वर चौकात वीज बिलाची होळी करुन निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी जि.प.कृषी व पशुसंवर्धन सभापती गोंिवदराव चिलकुरे, माजी जि.प. सदस्य ऋषिकेश बद्दे, माजी सभापती धोंडीराम सांगवे,शहराध्यक्ष अ‍ॅड. गणेश सलगरे, गणेश धुमाळे, शंकर बेंबळगे, संतोष डोंगरे, सिद्धंिलंग शिवणे, सतीश भिक्का, नागनाथ चलमले,अमर देवंगरे, रतन शिवणे, किरण कोरे, सुमीत दुरूगकर, पंकज रक्साळे, सचिन सांगवे, संदीप बिराजदार, गणेश मोहिते, गणेश खरटमोल, माधव कात्रे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अहमदपूर येथे भरमसाठ वीजबिलाबाबत जनतेला रास्त सवलत द्यावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाकेयांच्या मार्गदर्शनात अहमदपूर येथे वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती भारत चामे, भारतीय जनता पक्षाचे अहमदपूरचे तालुकाध्यक्ष हणमंत देवकत्ते, उपसभापती बालाजी गुट्टे, धनराज गुट्टे, माधव मुंढे, परमेश्वर पाटील, प्रताप पाटील, हेमंत गुट्टे, दत्तात्रय जमालपुरे, संतोष कोटलवार, श्याम यादव, सय्यद आरेफ, बबलू पठाण, नागेश केंद्रे, गंगाधर हेंगणे, अनंत गुट्टे, ऋषी गुट्टे आदी कार्यकर्ते सहभागी होते.

भाजपातर्फे राज्यभर वीज बिलांची होळी; वीज बिल माफी न केल्यास तीव्र आंदोलन !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या